जळगावात मूग ४००० ते ४२०० रुपये क्विंटल
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद व मुगाला सारखेच म्हणजेच ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. मुगाची आवक सरत्या आठवड्यात कमी झाली; पण उडदाची आवक मात्र कायम होती. 

मध्यंतरी बाजार समितीला हमीभावापेक्षा कमी दरात किती धान्याची विक्री झाली व बाजार समितीने काय कारवाई केली, अशी विचारणा करणारे पत्र शासनाने दिल्याने लिलाव बंद होते. मागील आठवड्याच्या सुरवातीला बाजार किंवा लिलाव सुरळीत झाले; पण दर मात्र फारशे वाढले नाहीत.

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद व मुगाला सारखेच म्हणजेच ४००० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. मुगाची आवक सरत्या आठवड्यात कमी झाली; पण उडदाची आवक मात्र कायम होती. 

मध्यंतरी बाजार समितीला हमीभावापेक्षा कमी दरात किती धान्याची विक्री झाली व बाजार समितीने काय कारवाई केली, अशी विचारणा करणारे पत्र शासनाने दिल्याने लिलाव बंद होते. मागील आठवड्याच्या सुरवातीला बाजार किंवा लिलाव सुरळीत झाले; पण दर मात्र फारशे वाढले नाहीत.

मुगाची प्रतिदिन आवक सरासरी ३०० क्विंटल राहीली, तर उडदाची आवक प्रतिदिन ६०० क्विंटल एवढी राहिली. सोयाबीनची आवक मात्र अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर बाजार समितीमध्ये जाहीर झाले नाहीत. 

कोथिंबीरला मात्र चांगले दर मिळाले. कोथिंबीरला ३५०० ते ८००० व सरासरी ६५०० रुपये प्रतिक्विंटल दर राहिला. आवक प्रतिदिन पाच क्विंटल अशी होती. मिरचीला ८०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आवक प्रतिदिन ४० क्विंटल अशी होती.

टोमॅटोची आवकही स्थिर दिसून आली, टोमॅटोला ८०० ते १५०० दर मिळाला. सरासरी आवकेचे प्रमाण ३० क्विंटल असे राहिले. कांदे, बटाटे यांची आवकही स्थिर होती. भेंडीची आवक मात्र फारशी नव्हती. बटाट्याला सरासरी ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर आवक प्रतिदिन १८० क्विंटल अशी होती. 

केळीला अपेक्षित दरांची प्रतीक्षा
केळीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीने जाहीर केल्यानुसार २५ सप्टेंबर रोजी नवती केळीचे दर प्रतिक्विंटल १०२५ रुपये होते. २६ रोजी त्यात २५ रुपयांनी क्विंटलमागे घट नोंदविण्यात आली. २६ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबरपर्यंत केळीचे दर स्थिर होते. १००० रुपये प्रतिक्विंटल, असा दर मिळाला; पण सोमवारी (ता.२) दरात पुन्हा २५ रुपये प्रतिक्विंटल, अशी घट झाली व दर ९७५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आले.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...