इच्छुक शेतकरी नवरदेवांसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

इच्छुक शेतकरी नवरदेवांसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
इच्छुक शेतकरी नवरदेवांसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

कोल्हापूर : अहो, श्रीगोंदा तालुक्‍यातून बोलतोय, माझा भाऊ लग्नाचा आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याचे लग्न जमेना, याचे कारण म्हणजे  तो शेती करतो, प्रश्‍न खरंच गंभीर झालाय. शेतकऱ्यांना जेवढी उत्पन्नाची चिंता, तेवढीच चिंता योग्य वयात मुलांचे लग्न होत नसल्याची आहे. वय वाढत चाललेल्या इच्छुक शेतकरी पुत्रांच्या लग्नासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अनेक शेतकऱ्यांनी 'ॲग्रोवन'कडे व्यक्त केली.

मलिकवाड (जि. बेळगाव) येथे वीर सेवा दलाच्या पुढाकाराने केवळ शेतकरी वर निवडण्यासाठी जैन समाजाच्या वतीने शेतकरी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त मंगळवारी (ता. ३) प्रसिद्ध होताच एका वेगळ्या विषयाची मांडणी केल्याबद्दल वाचकांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विवाह इच्छुक शेतकऱ्यांनी दूरध्वनीद्वारे आपल्या भावनांना वाट करून दिली. 

माझी पाच एकर शेती आहे. ती शेती बागायती आहे. दोन मुले आहे एकाचे लग्न झाले आहे. तो खासगी कंपनीत नोकरीला आहे. पण जो शेती करतो त्याचे लग्न जमायला तयार नाही. लग्न जमत नसल्याने कुटुंबात चिंता पसरली आहे. आता तो पस्तीशीला आला आहे. आता लग्न जमणार कसे या चिंतेत आम्ही असल्याचे सोलापूर जिल्ह्यातील अमर पाटील यांनी सांगितले. 

माझी मुलगी लग्नाची आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील असून मुलीला शेतकरी नवरा नकोय. अनेक स्थळे येऊन गेली. चांगली शेती असणारी ओळखीच्या स्थळांनीही तिला पसंती दिली. पण अनेक स्थळे बागायतदार असूनही तिने त्यांना नकार दिला. तिला कसे समजवायचे या चिंतेत आम्ही आहोत, अशी चिंता वाळवा तालुक्‍यातील एका मुलीच्या पालकाने व्यक्त केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com