agriculture news in Marathi, agrowon, The need for collective efforts to stop ballworm | Agrowon

बोंड अळी रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

हिंगोली (प्रतिनिधी)ः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्यावेत्ता डाॅ. यू. एन. आळसे यांनी केले.

हिंगोली (प्रतिनिधी)ः कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी विद्यावेत्ता डाॅ. यू. एन. आळसे यांनी केले.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग यांच्यातर्फे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा गुरुवारी (ता.26) आयोजित करण्यात आली होती. या वेळी डाॅ. आळसे बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल, कृषी उपसंचालक श्री. लाडके, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एम. डी. तीर्थकर, केव्हीकेचे डाॅ. पी. पी. शेळके, राजेश भालेराव, अजय सुगावे आदी उपस्थित होते.

डाॅ. आळसे म्हणाले, की एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने शेंदऱ्या बोंड अळीचे नियंत्रण करता येते. लागवडीपूर्वी खोल नांगरट करावी, फेरपालट करावा, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड करावी. एका गावात शक्य असेल तर एकाच वाणाची लागवड करावी. बी. टी. कपाशीभोवती आश्रय पिकांची लागवड करावी. त्यामुळे बोंड अळीला खाद्य मिळते.

स्वच्छता मोहीम राबवावी, मशागतीची कामे वेळेवर करावीत. जैविक मित्र किडींचे हेक्टरी 1.5 लाख अंडी कपाशीच्या शेतामध्ये तीन टप्प्यांत सोडण्यात यावीत. पाने, लागण्याच्या काळात निंबोळी अर्काची फवारणी करावी. फेरोमेन ट्रॅप, लाइट ट्रॅप आदींचा सामूहिकरित्या वापर केल्यास बोंड अळीचे नियंत्रण शक्य आहे. जिनिंग फॅक्टरीमध्ये लाइट आणि फेरोमेन ट्रॅप लावावेत. त्यामध्ये बोंड अळीचे पतंग पकडून ते नष्ट करावेत. सामूहिकरित्या प्रयत्नातून बोंड अळीचे नियंत्रण शक्य आहे, असे डाॅ. आळसे यांनी नमूद केले.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...