साखर उद्योगाच्या भल्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची गरज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : साखर आयातीबाबत अपुऱ्या माहितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला असला, तरी साखर उद्योगाची अवस्था सुधारण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी मिळून सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

शेतकरी संघटनेने सतत शेतीमालाच्या अनावश्यक आयातीला विरोध केला आहे. शेती व्यापारातील व साखर उद्योगातील सरकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी संपावा ही शेतकरी संघटनेची सुरवातीपासूनची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाण्यातील डायघर परिसरात सापडलेेल्या साखरेचे खरे वास्तव काय आहे हे तपासले पाहिजे.

१ मे २००६ रोजी तत्कालीन सरकारने ड्यूटी फ्री इंपोर्ट अॉथोरायझेशन स्कीम (डीएफआयए) या नावाने एक योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत भारतातील एखाद्या निर्यातदाराने दुसऱ्या देशात एखादा माल निर्यात केला तर तो माल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आयात केल्यास त्याला आयात शुल्क लागणार नाही. या योजनेचा लाभ साखरेसहीत अनेक वस्तूंच्या निर्यातदारांना घेता येत आहे. 

देशांतर्गत साखरेची गरज सुमारे २५० लाख टन प्रतिवर्ष आहे. आता झालेली आयात ही फक्त ३००० हजार टन आहे. त्याचा देशांतर्गत व्यापारावर फार परिणाम होणार नाही, असेही अनिल घनवट यांनी सांगितले. उसाच्या पिकाला मिळणाऱ्या भावाच्या शाश्वतीने शेतकऱ्यांचा अोढा इतर पिकांपेक्षा उसाकडेच जास्त राहिला आहे. मात्र निर्यात व साठ्यांच्या बाबतीत कायमस्वरूपी धोरण नसल्यामुळे साखर कारखानदार व व्यापाऱ्यावर कायमची टांगती तलवार असते. तसेच देशात यंदा किती साखर उत्पादन होणार याबाबत निश्चित आकडेवारी सरकारकडे नसते. त्यामुळे पुढील नियोजन ही ढासळते. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी मिळून सरकारवर दबाव निर्माण केला तरच कायमस्वरूपी धोरण ठरेल, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com