दाक्षिणात्य राज्यांसाठी नवे कापूस वाण

जळगावातील कापूस संशोधन केंद्राकडून विकसीत करण्यात आलेले ‘जेएलए ०६०३’ देशी वाण.
जळगावातील कापूस संशोधन केंद्राकडून विकसीत करण्यात आलेले ‘जेएलए ०६०३’ देशी वाण.

जळगाव : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत कापूस संशोधन केंद्राने दाक्षिणात्य राज्यांमधील जमिनी व वातावरणात अधिक उत्पादन देणारा जेएलए ०६०३ हा देशी सुधारित कापूस वाण विकसित केले आहे.

अधिक वजनाची बोंडे, कमी पाण्यात तग धरण्याची क्षमता या वाणात असून, कापूस संशोधनासंबंधीच्या क्षेत्रात जळगाव कापूस संशोधन केंद्राचे हे मोठे यश मानले जात आहे.

या वाणाच्या महाराष्ट्र व दाक्षिणात्य राज्यांमध्ये १२ वर्षे चाचण्या चालल्या. यातील सात वर्षे महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, परभणी, धुळे आदी ठिकाणी त्याच्या चाचण्या झाल्या. यानंतर दाक्षिणेकडील कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या क्षेत्रात पाच वर्षे चाचण्यात झाल्या. त्यानंतर निवड पद्धतीने हे वाण विकसित करण्यात आले.

राष्ट्रीय कमिटीची मान्यता या वाणासंबंधीच्या चाचण्या यशस्वी झाल्या. त्यात हे वाण दाक्षिणात्य राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत अधिक उत्पादन देते. त्याचा धागा ताकदवान व बोंड इतर देशी कापूस वाणांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले. या वाणाच्या प्रसाराला एप्रिल २०१७ रोजी कोईमतूर (तमिळनाडू) येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठात झालेल्या केंद्रीय कापूस संशोधन व विकास कमिटीने मंजुरी दिली आहे. अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्पांतर्गत ही बैठक झाली.

ब्रिटिशकालीन केंद्र जळगाव येथील कापूस संशोधन केंद्र हे ममुराबाद (ता. जळगावनजीक) येथे आहे. जळगाव शहरापासून चार ते पाच कि.मी. अंतरावर ते असून, ब्रिटिशांनी १९१३ मध्ये या केंद्राची कृषी संशोधन केंद्र म्हणून स्थापना केली होती. त्यात हवामान शास्त्रापासून ते इतर सर्व तत्कालीन कोरडवाहू पिकांवर संशोधन केले जायचे. १९३३ मध्ये धुळे येथील कापूस संशोधन केंद्रात स्थलांतरित झाले. तेव्हापासून या केंद्रात संशोधन सुरू आहे. देशी सुधारित कापसावर या केंद्रात संशोधन केले जाते.

संशोधन कौतुकास्पद या केंद्रात १९६२ पूर्वी बनिला, जरिला, विरनार, एनआर- ५ या देशी कापूस वाणांचे संधोधन होऊन त्यांचा प्रसार झाला. १९६२ मध्ये राज्यभर लोकप्रिय ठरलेल्या वाय-१ या वाणाचे संशोधनही याच केंद्रात झाले. २००३ मध्ये फुले जेएलए-७०४ हा वाण विकसित झाला. तो वाय-१ पेक्षा २५ टक्के अधिक उत्पादन देतो. त्याचे या केंद्रात दरवर्षी कमी दरात शेतकऱ्यांना वितरण केले जाते. दरवर्षी या वाणाचे १२ क्विंटल वितरण केले जाते. २०१५ मध्ये याच केंद्रात जेएलए - ५०५ हा देशी सुधारित कापूस वाण संशोधन होऊन विकसित झाला. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसा येथे त्याचा प्रसार झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com