संकेश्‍वर ऊस संशोधन केंद्राच्या नव्या ऊस जाती
के एम पाटील
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

आम्ही दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय स्तरावर या तीन जाती विविध राज्यांतील ऊस संशोधन केंद्रांमध्ये शास्त्रीय चाचणीसाठी दिलेल्या आहेत. यंदाच्या वर्षी त्याचे निष्कर्ष हाती येतील.
- डॉ. संजय पाटील, ऊस पैदासकार, ऊस संशोधन केंद्र, संकेश्वर, जि. बेळगाव

संकेश्‍वर, जि. बेळगाव ः कर्नाटक राज्यातील धारवाड कृषी विद्यापीठाच्या संकेश्‍वर (जि. बेळगाव) येथील ऊस संशोधन केंद्राने शेतकरी आणि साखर कारखान्यांची गरज लक्षात घेऊन आठ ते नऊ महिन्यांत तयार होणारी, उत्पादन आणि साखर उताऱ्यात सरस असलेली एसएनके ०९२११ तसेच १२ ते १४ महिन्यांच्या मध्यम कालावधीत पक्व होणारी एसएनके ०९२२७ आणि १२ ते १६ महिन्यांत पक्व होणारी एसएनके ०९२९३ या जाती विकसित केल्या आहेत.

संकेश्‍वर ऊस संशोधन केंद्रातील मुख्य ऊस पैदासकार डॉ. संजय पाटील याबाबत म्हणाले, की गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत या ऊस जातींच्या विविध स्तरावर चाचण्या घेण्यात आल्या. प्रचलित ऊस जातींपेक्षा या जाती ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात सरस ठरल्या आहेत. प्रचलित जातींमधील लवकर येणारा फुलोरा, पानावरील कुसळ, पाण्याचा ताण सहन न करण्याची क्षमता, कमी फुटवा, कमी उगवण क्षमता हे दोष नवीन जातींमध्ये दिसत नाहीत. या जातींमध्ये ऊस पक्वतेचा कमी कालावधी, ऊस उत्पादन आणि साखर उताऱ्यात वाढ हे गुणधर्म आहेत.

कर्नाटकमध्ये लागवडीसाठी शिफारस
संकेश्वर येथील ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या एसएनके ०९२११, एसएनके ०९२२७ आणि एसएनके ०९२९३ या जातींची सध्या कर्नाटक राज्यामध्ये लागवडीसाठी शिफारस आहे. आम्ही दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय स्तरावर या तीन जाती विविध राज्यांतील ऊस संशोधन केंद्रांमध्ये शास्त्रीय चाचणीसाठी दिलेल्या आहेत. यंदाच्या वर्षी त्याचे निष्कर्ष हाती येतील, असे डॉ. संजय पाटील (ऊस पैदासकार, ऊस संशोधन केंद्र, संकेश्वर, जि. बेळगाव) यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...