पुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना निर्यात अनुदान देण्याबाब
ताज्या घडामोडी
सांगली : जिल्ह्यात मृग हंगामातील डाळिंबाचा बहर धरला जातो. यंदा सुरवातीला पाऊस कमी असल्याने या बहरातील डाळिंब बहरली आहेत. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसा ऊन आणि रात्री पाऊस याचा फटका डाळिंबाला बसला असल्याने तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
यंदा पाण्याची कमतरता असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी टॅंकरच्या सहाय्याने डाळिंबाच्या बागा जगवल्या आहेत. यामुळे यंदा कोणतेच संकट येणार नसल्याने डाळिंब उत्पादकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

जून-जुलैमध्ये पोषक वातावरण असल्याने डाळिंबाला सुमारे १०० ग्रॅमच्या दरम्यान फळ लागले आहे. बागा चांगल्या बहरू लागल्या आहेत. दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत कवठे महांकाळ तालुक्यात परतीच्या पावसाने डाळिंब उत्पादकांना जरी दिलासा दिला असला तरी डाळिंब उत्पाकदांवरील संकट वाढले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसा ऊन आणि रात्री पाऊस यामुळे आद्रता वाढली आहे. यामुळे डाळिंबावर तेलकट आणि मर रोगाचा प्रादुभार्व होण्यास प्रारंभ झाला आहे.
गेल्यावर्षी पावसाने मृग हंगाम वाया गेला होता.
डाळिंब पिकावर यंदा कोणते संकट येणार याची भीती शेतकऱ्यांच्या मनात होतीच. मात्र, सुरवातीपासून वातावरण आणि निसर्गाने चांगली साथ दिली. यामुळे मृग हंगामातील डाळिंब बहरू लागली. डाळिंबाचे सेटिंगसुद्धा चांगले झाले, यामध्ये फुलाची गळही झाली नाही. यामुळे उत्पादनात काही प्रमाणात वाढ होईल अशी आशा डाळिंब उत्पादकांच्या मनात होती.
मात्र, परतीच्या पावसाने डाळिंब उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. हा रोग आटोक्यात आण्यासाठी शेतकरी फवारणी करू लागले आहेत.
- 1 of 143
- ››