agriculture news in Marathi, agrowon, One lakh gudhi ordered by BJP | Agrowon

भाजपकडून एक लाख गुढींची अॉर्डर
हरी तुगावकर
सोमवार, 26 मार्च 2018

लातूर ः मराठवाड्याच्या अर्थकारण व राजकारणावर परिणाम करणारा देशातील चौथा रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना येथे होऊ घातला आहे. याचे भूमिपूजन ३१ मार्च रोजी होत आहे. यातून विकासाची गुढी उभारली जाणार आहे. याकरीता पक्षाच्या वतीने एक लाख गुढींची अाॅर्डर शहरातील बचत गटांच्या महिलांना देण्यात आली आहे. 

या गुढ्या घरोघरी देऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार ते पाच लाख लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नादी ठरणार आहे. 

लातूर ः मराठवाड्याच्या अर्थकारण व राजकारणावर परिणाम करणारा देशातील चौथा रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना येथे होऊ घातला आहे. याचे भूमिपूजन ३१ मार्च रोजी होत आहे. यातून विकासाची गुढी उभारली जाणार आहे. याकरीता पक्षाच्या वतीने एक लाख गुढींची अाॅर्डर शहरातील बचत गटांच्या महिलांना देण्यात आली आहे. 

या गुढ्या घरोघरी देऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चार ते पाच लाख लोकांना एकत्र आणून हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची नादी ठरणार आहे. 

गेल्या महिन्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा कारखाना लातूरला करण्याची घोषणा करावी लागली. कारखान्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम भव्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

किमान चार लाख लोक कसे जमतील याकरीता पक्षाच्या वतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. श्री. निलंगेकर यांनी त्याचा कृती आराखडाही तयार केला आहे. याकरीता पक्षाच्या वतीने शहरातील महिला बचत गटांच्या महिलांना एक लाख गुढी तयार करण्याची अॉर्डर देण्यात आली आहे. सर्व साहित्य पक्षाच्या वतीने या महिलांना देण्यात आले आहे. 

गुढीवर लावण्यात येणारा लहान तांब्या दिल्लीहून मागवण्यात आला आहे. इतर साहित्यही वेगवेगळ्या ठिकाणांवरून मागवण्यात आले आहे. एका गुढीसाठी किमान पंधरा रुपये खर्च आहे. म्हणजेच पक्षाच्या वतीने पंधरा लाख रुपये खर्च केला जात आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुढी तयार करण्याचे काम आम्हा बचत गटांना देण्यात आले आहे. सर्व साहित्य पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. आम्ही फक्त गुढी तयार करून देत आहोत. एक गुढी तयार करण्यासाठी एक रुपया घेत आहोत. एक महिला दिवसाला दीडशे ते दोनशे गुढी तयार करीत आहे..
- आशा रंजिरे, अध्यक्ष, रामलिंगेश्वर बचत गट

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...