agriculture news in Marathi, agrowon, One lakh rupees for each district for community weddings | Agrowon

सामुदायिक विवाहांसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे  : शेतकऱ्यांच्या मुलांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाला एक लाख रुपये देणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दिली. शुक्रवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मकरंद अनासपुरे म्हणाले, की अवकाळी पाऊस, गारपिटीच्या अस्मानी संकटाने उभे पीक आडवे होत आहे. 

पुणे  : शेतकऱ्यांच्या मुलांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाला एक लाख रुपये देणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दिली. शुक्रवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मकरंद अनासपुरे म्हणाले, की अवकाळी पाऊस, गारपिटीच्या अस्मानी संकटाने उभे पीक आडवे होत आहे. 

यातच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अलीकडच्या काळात बेहिशोबी होत आहे. शेतकऱ्याचे कुटुंबही शेतीवर अवलंबून आहे. यातच मुलीचे लग्न हे शेतकऱ्याच्या अभिमानाचा, अस्मितेचा विषय असतो. त्यामुळे कर्ज काढून लग्न केले जाते. हे कर्जही शेतीवरच फेडायचे असते. नांदेड भागात आत्महत्या केलेल्या मोहिनी भिसे हिचे शेती विकून वडिलांनी लग्न लावून दिले तर पुढे त्यांचा स्त्रोत काय याचा विचार करून जीवन संपविण्याचा मार्ग पत्करला. त्यानंतरही मराठवाड्यात मुलींचया आत्महत्या झाल्या आहेत. अशावेळी धार्मिक स्थळांकडे असलेला निधी सामूहिक विवाहासाठी वापरल्यास शेतकऱ्यांना मदत होईल. यातून हुंड्यांचे दुष्टचक्र भेदण्यासाठी वेगळा मार्ग मिळेल. 

नाम फाउंडेशन सामुदायिक विवाहाचे आयोजन करत आहे. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याला एक लाख रुपये देणार आहेत. यात आत्महत्या बहुल भागाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. लग्न हा आनंद सोहळा सामाजिक होण्यासाठी एक गाव, एक तिथी ही प्रक्रिया सुरू होईल. यातून सर्वधर्मीय विवाहाला मदत केली जाईल. नाना पाटेकर म्हणाले, की सामुदायिक विवाहासाठी जास्तीत जास्त निधी धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत उभा होणार आहे. बीसीसीआयमार्फतही या कामासाठी निधी उपलब्ध होणार आहे. अशा संस्था पुढे आल्यास या कामाला अधिक महत्त्व प्राप्त होते. देवस्थानांना मिळणारा पैसा समाज कामासाठी वापरला जाईल.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...