agriculture news in Marathi, agrowon, One million farmers participate in Value Chains says cm | Agrowon

'व्हॅल्यू चेन्स'मध्ये दहा लाख शेतकऱ्यांचा सहभाग : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018

मुंबई  : कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी गेल्या तीन वर्षांत राज्य शासनाने चारपट गुंतवणूक केली. त्यामुळे कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि उत्पादन वाढले आहे. व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून राज्यातील दहा लाख शेतकरी जोडले गेले असून, सार्वजनिक खासगी सहभागी तत्त्वावरील एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांमध्ये राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुंबई  : कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी गेल्या तीन वर्षांत राज्य शासनाने चारपट गुंतवणूक केली. त्यामुळे कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि उत्पादन वाढले आहे. व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून राज्यातील दहा लाख शेतकरी जोडले गेले असून, सार्वजनिक खासगी सहभागी तत्त्वावरील एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांमध्ये राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

सार्वजनिक खासगी सहभागी तत्त्वावरील एकात्मिक कृषी विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्रालयात घेण्यात आला, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात कृषी विकासाचे चित्र बदलणारे अनेक प्रकल्प राज्यात सुरू आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी विशेष लक्ष देऊन व्हॅल्यू चेन्स, बाजारपेठांची संलग्नता आणि जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्यावर भर दिला आहे. 

गेल्या तीन वर्षांत चारपट गुंतवणूक कृषी क्षेत्रात करण्यात आल्याने उत्पादन आणि उत्पादकता वाढली आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. राज्याच्या या कार्याची दखल घेऊन निती आयोगानेदेखील कौतुक केले आहे. व्हॅल्यू चेन्स वाढविल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आश्वस्त बाजारपेठ मिळाली आहे.

राज्यात व्हॅल्यू चेन्सच्या माध्यमातून दहा लाख शेतकऱ्यांचा सहभाग झाला असून, तो अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. एकात्मिक कृषी विकासाच्या प्रकल्पांना अधिक गती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग त्यामध्ये मिळवावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  कृषी विकासाच्या प्रकल्पांना चालना मिळण्याकरिता केंद्र शासनाच्या धोरणाशी संलग्न असे स्वतंत्र धोरण राज्याने तयार केले आहे. जेणेकरुन कृषी विकासाच्या योजना राबविताना त्यात कुठलीही पोकळी राहणार नाही. सेंद्रिय शेती काळाची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सेंद्रिय शेती अभियान कृषी विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

महावेध अॅपचे उद्‍घाटन
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महावेध या स्वयंचलित हवामान केंद्राच्या अॅपचे उद्‍घाटन करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना तापमान, आर्द्रता, पुढील १५ दिवसांतील हवामान याविषयी रियल टाइम माहिती मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज पडण्याबाबतचा अंदाजदेखील या ॲपद्वारे वर्तविण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...