agriculture news in Marathi, agrowon, onion Seed Production farmers in taluka | Agrowon

कांदा बीजोत्पादनाला दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांची पसंती
अशोक काटकर 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

दारव्हा, जि. यवतमाळ : अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पार खचून गेले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील खोपडी (बु.) येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कांदा बीजोत्पादनाला पसंती दिली आहे. यातून त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग गवसला आहे.

दारव्हा, जि. यवतमाळ : अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पार खचून गेले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील खोपडी (बु.) येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कांदा बीजोत्पादनाला पसंती दिली आहे. यातून त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग गवसला आहे.

नापिकीच्या गर्तेत सापडलेले शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले असून, पुढील वर्षी लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. दारव्ह्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर खोपडी (बु.) गाव आहे. येथील शेतकरी नवनवीन प्रयोगांसाठी ओळखले जातात. यंदा सहा शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादनाचा निर्णय घेतला. नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यात त्यांनी लाल कांदा रोपांची लागवड केली. 

दीपक क्षीरसागर यांनी नोव्हेंबरच्या अखेर या बीजोत्पादन कांद्याची चार एकरांत लागवड केली. सुरवातीला जळगाव येथून चार एकरांसाठी ५५ क्विंटल फुरसुंगी लाल कांद्याची १७०० रुपये दराने खरेदी करून लागवड केली. त्यानंतर निंदण, खत, फवारणी, पाणी, मजूर, तोडणी आदी सर्व बाबींवर अडीच लाखांचा खर्च अपेक्षित आहे. प्रतिएकर पाच क्विंटल, असे एकूण चार एकरांत वीस क्विंटल कांदा बीजोत्पादन होईल, असा अंदाज आहे. पंचवीस हजार रुपये प्रतिक्विंटलने हे कांदाबीज जळगाव येथील एक कंपनी खरेदी करणार आहे, तसा करार शेतकऱ्यांसोबत झाला आहे. 

खर्च वजा जाता चार एकरांत साडेचार महिन्यांत अडीच लाख निव्वळ नफा होईल, असा विश्‍वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला. क्षीरसागर यांच्यासह भरत घोंगे यांनी एक एकर, जयेश मिरासे यांनी पाच एकर, गजानन घाटे यांनी एक एकर, राजू पुसदकर यांनी एक एकर, तर शेषराव सावंत यांनी दोन एकरांत कांदा बीजोत्पादन घेतले आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत या शेतकऱ्यांनी या वर्षी कांदा बीजोत्पादन करून आपल्या उत्पादनात वाढ केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गावाला भेट दिली. या वेळी पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या पीकपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले होते, त्याचाच परिणाम म्हणून हळद पीक घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

हळद पिकासंदर्भात माहिती घेऊन कळमनुरी येथून बियाणे आणले आहे. कांदा बीजोत्पादनाबरोबर आम्ही आता हळद पीकदेखील घेणार आहोत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत वेगवेगळ्या पीकपद्धतीचा अवलंब केल्यास निश्‍चितच फायदा होतो.
- भरत घोंगे, शेतकरी, खोपडी (बु.)

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...