कर्जमाफीची ऑनलाइन यंत्रणाच बोगस : रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

पुणे  : कर्जमाफीची प्रक्रिया फसवी आणि संथगतीने सुरू आहे. त्यात पुन्हा दहा लाख अर्ज बोगस निघाल्याचा सरकारचा दावा हास्यास्पद आहे. मात्र अर्जापेक्षाही सरकारची ऑनलाइन यंत्रणाच बोगस असल्याची टीका संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

तसेच बोगस कामे करणाऱ्यांवर कारवाई का करीत नाही, असा रोखठोख सवालदेखील पाटील यांनी उपस्थित केला. कर्जमाफी ही काही भिक नाही. आमच्याच घामाचा लुबाडलेल्या पैशातून काही रक्कम आम्हाला कर्जमाफीच्या रूपाने देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ती देण्यातदेखील सतराशेसाठ अटी लादल्याचे पाटील म्हणाले.

संपूर्ण कर्जमाफी अपेक्षित असतानाही चालढकल केली जात आहे. आता महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील कर्जमाफीच्या प्रक्रियेत दहा लाख अर्ज बोगस असल्याचे सांगत आहे. मुळात हा आकडा आला कोठून, बोगस अर्ज असतील तर मग ते जाहीर करून कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान पाटील यांनी केले.

बोगस अर्जापेक्षाही सरकारची ऑनलाइन यंत्रणाच बोगस असून, शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा चालू आहे. बोगस आकडेवारी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सरकारने ठेवावी, असेही श्री. पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com