आॅनलाइन सातबाराचे केवळ १२ टक्के काम पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली : संगणकीकृत सातबारा करण्यासाठी राज्यातील सर्व महसूल विभाग युद्धपातळीवर काम करते आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा देण्यास सोपे जाणार आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात याउलट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील ७२९ गावांपैकी केवळ ९१ गावांतील सातबारा ऑनलाइन झाला असून केवळ १२ टक्केच काम झाले आहे.

यामुळे संगणकीकृत सातबारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाचे डोळे कधी उघडणार अशी चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

यामध्ये संगणकीकृत सातबाराचे काम कुठपर्यंत झाले, अशी विचारणा केली असता. सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे समोर आले. राज्यातील सातबारा संगणकीकृत करण्याचे काम जलद सुरू असताना जिल्हा याबाबत पिछाडीवर राहिला आहे. यासाठी तलाठी, मंडल अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही शेतकऱ्यांच्यातून बोलले जात आहे.

प्रामुख्याने सातबारा संगणकीकृत करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र, तलाठी गावात कमी तर तालुक्‍याच्या ठिकाणीच अधिक असतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील ७२९ गावांपैकी खाते दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झालेचे घोषणापत्र झालेली गावे २७९ तर पुन्हा दुरुस्त करून पूर्ण झालेचे घोषणापत्र झालेली गावे १०२ आहेत. अर्थात ७२९ गावापैकी केवळ ९१ गावातील सातबारा अचूक संगणकीकृत झाली आहे. उर्वरित गावे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.

तलाठ्यांपासून ते तहसीलदारांनी याबाबत प्राधान्य दिले नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना प्राधान्याने ऑनलाइन सातबारा याचे काम पूर्ण करा अथन्या घरी जावे लागेल, अशी धमकी दिली आहे. आता संबंधीत विभाग यासाठी किती वेळ देणार आणि कधी काम करण्यासाठी पुढे येणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com