agriculture news in Marathi, agrowon, Only 28 percent water stock in Nashik dams | Agrowon

नाशिकच्या धरणांत २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण होत आहे. सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यात ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिनाअखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण होत आहे. सरासरी २८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जिल्ह्यात ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  

जिल्ह्यात मार्चअखेरपासून उष्णतेची लाट आली असून, पाऱ्याने सरासरी ४० अंश सेल्सिअस तपमान कायम ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या व जनावरांसाठी पाण्याच्या मागणीत वाढ झाली. परिणामी सिंचन, बिगर सिंचनासाठी धरणांमधून आवर्तने सोडण्यात आल्याने एप्रिलअखेर धरणांमध्ये २८ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. महिनाभरात जवळपास १६ टक्के धरणातील पाण्याचा वापर करण्यात आला असून, सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. 

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर खुद्द गंगापूर धरणात ४२ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ४८ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोऱ्यात २० टक्के, तर पालखेड धरण समूहात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे. 

सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर, देवळा, नांदगाव या सहा तालुक्यांत ३५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, मे महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार असल्याने टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही शिवाय प्रशासनाकडून जलयुक्त शिवार योजनेमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात असतानाही यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

अपयश लपविण्याचा प्रकार
प्रशासन व्यवस्थेने जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा व त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दावा केला असला, तरी तो फोल ठरला आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पाण्याची टंचाई भासू लागली असताना, निव्वळ जलयुक्त शिवार योजनेचा फोलपणा उघडकीस येऊ नये म्हणून टॅँकर सुरू करण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...