agriculture news in Marathi, agrowon, Only registration for Gram purchases | Agrowon

हरभरा खरेदीची केवळ नोंदणीच
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीसाठी केवळ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. बीड जिल्ह्यातील तीनच खरेदी केंद्रांवर थोडीबहुत हरभऱ्याची हमी दराने खरेदी झाल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीसाठी केवळ शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. बीड जिल्ह्यातील तीनच खरेदी केंद्रांवर थोडीबहुत हरभऱ्याची हमी दराने खरेदी झाल्याचे समोर आले आहे. 

मराठवड्यात हमी दराने तुरीची खरेदी सुरू आहे. ही खरेदी अंतिम टप्प्यात असतानाच शासनाने हरभऱ्याचीही हमी दराने खरेदी करण्याची घोषणा केली आहे. हरभऱ्याच्या हमी दराने खरेदीसाठी शेतकरी उत्सुक असले तरी तूर खरेदीसाठी जशी जागेची अडचण येते आहे तशीच अडचण हरभरा खरेदी सुरू झाल्यास येऊ शकते. त्यामुळे अजूनही औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात हरभऱ्याची अजून खरेदीच सुरू झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बीड जिल्ह्यातच अंबाजोगाई आणि आष्टी व कडा या तीन खरेदी केंद्रांवरच ३६२ शेतकऱ्यांचा ५२२१ क्‍विंटल हरभरा खरेदी केला गेला आहे. त्यामध्ये कडा येथील केंद्रावर ४२ शेतकऱ्यांचा ४६३ क्‍विंटल, आष्टी येथील केंद्रावर १७७ शेतकऱ्यांचा १६६६ क्‍विंटल; तर अंबाजोगाई येथील खरेदी केंद्रावरून १४३ शेतकऱ्यांचा ३०९२ क्‍विंटल हरभरा हमी दराने खरेदी करण्यात आला आहे. 

बीड जिल्ह्यात हरभऱ्याच्या खरेदीला मुहूर्त मिळाला असला, तरी खरेदी केलेला हरभरा साठवायला गोडाऊनमध्ये जागाच शिल्लक नाही. त्यामुळे खरेदी केलेला सर्व हरभरा खरेदी केलेल्या केंद्रावरच पडून आहे. अर्थात जोवर तो गोदामात साठवीला जात नाही, तोवर त्या मालाचा मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही अशी स्थिती आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...