'ईव्हीएम'वरून विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या विजयावर ईव्हीएममधील गोंधळ असल्याचे बोलले जात असून, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करत भाजपवर हल्ला चढविला आहे.  

कर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून भाजपला लक्ष्य केले. ईव्हीएमचा विजय असो, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले. यासह विरोधकदेखील ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. 

राज ठाकरे यांच्या ट्विटनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील निवडणुकीत होत असलेल्या ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निवडणुका मत पत्रिकेवर घेऊन भारतीय जनता पक्षाने सर्वांच्या मनातला संशय काढून टाकावा. एकदा होऊनच जाऊद्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवार (ता.१५) केली.

पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाने मतपत्रिका घेऊन निवडणूका घ्याव्यात म्हणजे सर्वांच्या मनातील संशय निघून जाईल. कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने चांगले यश मिळवले असले तर भाजप निवडणूका जिंकते मात्र पोटनिवडणूका हरत आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मेहनत घतेली.

निकाल अनपेक्षित : पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकच्या अनपेक्षित निकालावरून मतदान प्रक्रियेवर शंका निर्माण झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने पुढे येऊन लोकांच्या शंकांचे समाधान केले पाहिजे. हे कुठेतरी थांबविले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत श्री. चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, हा निकाल आम्हाला नाही तर सर्वांनाच अनपेक्षित आहे. कॉंग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असे आम्हाला वाटत होते. पण अनपेक्षित निकाल लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com