agriculture news in Marathi, agrowon, In the orange area water shortage crisis | Agrowon

संत्रा पट्ट्यात पाणीटंचाईचे संकट झाले गडद
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

अमरावती ः भूगर्भातील खालावत चाललेली पाणीपातळी त्यामुळे संरक्षित सिंचन पर्यायांनी गाठलेला तळ, यामुळे जिल्ह्यात संत्रा उत्पादकांसमोर बागा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पाण्याची सोय करणे शक्‍य होत नसल्याच्या परिणामी काटपूर येथील शेतकरी पंकज चोंधे यांच्याकडून तब्बल २५० संत्रा झाडांची तोड करण्यात आली. 

अमरावती ः भूगर्भातील खालावत चाललेली पाणीपातळी त्यामुळे संरक्षित सिंचन पर्यायांनी गाठलेला तळ, यामुळे जिल्ह्यात संत्रा उत्पादकांसमोर बागा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पाण्याची सोय करणे शक्‍य होत नसल्याच्या परिणामी काटपूर येथील शेतकरी पंकज चोंधे यांच्याकडून तब्बल २५० संत्रा झाडांची तोड करण्यात आली. 

विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील ८५ ते ९० हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असल्याचे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेकडून सांगितले जाते. यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्यात आहे. यामध्ये वरुड, मोर्शी तालुक्‍यांचा समावेश आहे. यावर्षी मात्र संत्रा बागायतदारांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून झालेले अत्यल्प पर्जन्यमान हे त्यामागील एक मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पाऊस कमी झाल्याच्या परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत गेली; त्याचा फटका बसत या भागातील विहिरी आणि इतर संरक्षित सिंचनाचे पर्यायदेखील कोरडे पडले. उन्हाळ्यात संत्रा बागाची पाण्याची सोय करण्याचे आव्हान यामुळे शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. 
शेतकऱ्याने फिरविली जेसीबी

संत्रा बागेची पाण्याची सोय करणे शक्‍य नसल्याची जाणीव झाल्याने काटपूर येथील पंकज लोंधे या शेतकऱ्याने आपल्या बागेवर जेसीबी फिरविली. ममदापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ३१६ मधील दोन एकरातील २५० संत्राझाडे त्यांनी जेसीबीच्या साह्याने काढून टाकली. 

उपाययोजनांची गरज
विश्रोळी धरणातून कासी नदी व चारघड नदीपात्रात पाणी सोडून ते काठावरील सिमेंट प्लगमध्ये साठविल्यास काटपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्रा बागा जगविण्याचा प्रश्‍न निकाली निघू शकतो. त्याकरिता संबंधित प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

यावर्षी संत्रा उत्पादकांना बागा वाचविण्यासाठी मोठ्या पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. आंबीया बहाराची छोट्या आकाराची फळे सध्या झाडावर आहेत. आंबीया बहार यावर्षी चांगला फुटला; परंतु त्याला पाण्याची गरज आहे. अन्यथा फळगळ होऊ शकते. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत त्याची फळे मिळतात. जुलै महिन्यात मृगाची फुलधारणा होते. जानेवारी ते मार्चमध्ये मृगाचे उत्पादन मिळते. परंतु पाण्याअभावी झाडांचे अस्तित्व कसे राखावे हाच प्रश्‍न आहे.

- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज, नागपूर

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...