agriculture news in Marathi, agrowon, Orange crop yields 40 percent | Agrowon

संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान
मनोज खुटाटे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा पीक व उत्पादक मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे जेरीस आले आहेत. जानेवारी महिन्यात झालेली गारपीट व एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेला तापमान बदल यामुळे संत्रा पिकाचे ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे.

जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा पीक व उत्पादक मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे जेरीस आले आहेत. जानेवारी महिन्यात झालेली गारपीट व एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेला तापमान बदल यामुळे संत्रा पिकाचे ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्‍वर, सावनेर व हिंगणा तालुक्‍यात सुमारे ४५ हजार हेक्‍टर क्षेत्रात संत्रा पीक घेण्यात येते. मागील काही वर्षांत संत्रा पिकाला निसर्गाची व वातावरण बदलाची नजर लागल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१७ साली मे महिन्यात झालेल्या पावसामुळे ताणाचे गणित बिघडले. ८० टक्‍क्‍यांपर्यंत मृग बहर गळाला. 

सप्टेंबर व ऑक्‍टोबर यंदा जानेवारी महिन्यात गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेल्या तापमान बदलाचा फटका संत्रा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. तापमान ४४ डिग्रीपर्यंत पोहचल्याने फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच भूजल पातळीत होणारी घट यामुळे सिंचनास अडथळा निर्माण होणार असल्याने संत्रा गळती वाढेल असे जार शेतकऱ्यांनी सांगितले. 

मृग बहराची फुट निसर्गाच्या अनियमितेमुळे कमी झाली. काही भागात गारपीट झाल्याने त्याचे नुकसान झाले. तसेच गारपीटीच्या वेळी यावर आंबिया बहार देखील होता याचे नुकसान झाले. पण आता गारपिटीचा प्रभाव राहिला नाही. आता फक्त वाढत्या तापमानामुळे काही प्रमाणत फळांची गळ होईल. शेतकऱ्यांनी नियोजन करून सिंचन केल्यास फळगळ कमी होईल. 
- अजय आटे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड 

 

संत्रा व मोसंबीच्या बागांमध्ये फळांची फूट कमी झाली आहे. त्यात मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या गारपिटीचा परिणाम आता दिसू लागला आहे. आंबिया बहारच्या संत्राला झाडांना गारपिटीची इजा झाल्यामुळे वाळतात व तयार झालेल्या फंगसमुळे गळती वाढली आहे.
- वसंत चांडक, संत्रा उत्पादक, माजी सभापती, पं.स. नरखेड 

 

संत्र्याचा आंबिया बहर व मोसंबी बागांची फुट उशिरा झाली. सध्या फळे कोहळ्या अवस्थेत आहे. त्यात एकाएकी तापमानात वाढ झाल्यामुळे ५० ते ६० टक्‍के फळांची गळ झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्‍क्‍याहून अधिक असल्याने शासनाने नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी. 
- प्रदीप गंगाराम कळंबे, संत्रा उत्पादक, जलालखेडा 
 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...