agriculture news in Marathi, agrowon, Parbhani District Bank Growth in crop Loan | Agrowon

परभणी जिल्हा बॅंकेकडून पीक कर्जदरात वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

परभणी  ः २०१८-१९ या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात वाटप करावयाच्या पीककर्जाचे दर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने निश्चित केले आहेत. गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी कर्ज रकमेत ३ ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

यंदा जिरायती कपाशी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, बागायती कापूस प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, सोयाबीन प्रतिहेक्टर ६० हजार रुपये, तूर प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये याप्रमाणे पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी  ः २०१८-१९ या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात वाटप करावयाच्या पीककर्जाचे दर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने निश्चित केले आहेत. गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी कर्ज रकमेत ३ ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

यंदा जिरायती कपाशी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, बागायती कापूस प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केलेल्या कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, सोयाबीन प्रतिहेक्टर ६० हजार रुपये, तूर प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये याप्रमाणे पीककर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.

रिझर्व्ह बॅंक; तसेच नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेनुसार यंदा खरीप आणि रब्बी हंगामातील; तसेच बागायती पिकांसाठी शेतकऱ्यांना वाटप करावयाच्या पीककर्जाचे दर निश्चित करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सहकार खात्याचे अधिकारी, जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे अधिकारी, बँकेचे अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने केलेल्या शिफारशीनुसार जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी पीककर्ज वाटपाचे दर निश्चित केले आहेत. गतवर्षीपेक्षा प्रतिहेक्टरी कर्ज रकमेत ३ ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पूर्वहंगामी उसासाठी प्रतिहेक्टरी १ लाख २० हजार रुपये, आडसाली उसासाठी प्रतिहेक्टरी १ लाख ३० हजार रुपये, खोडवा उसासाठी प्रतिहेक्टरी १ लाख १० हजार रुपये, केळी पिकासाठी प्रतिहेक्टरी १ लाख १० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपये, हळदीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, बागायती कापूस प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचनावरील कापसासाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये, जिरायती कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, उन्हाळी भुईमुगासाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, तुरीसाठी प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपये, मुगासाठी प्रतिहेक्टरी२५ हजार रुपये याप्रमाणे कर्जवाटप करण्यात येणार आहे.

रब्बी हंगामातील बागायती गव्हासाठी प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये, भुईमुगासाठी प्रतिहेक्टरी ४५ हजार रुपये, सूर्यफुलासाठी प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये, फळपिकांमध्ये संत्रा, मोसंबीसाठी प्रतिहेक्टरी ८२ हजार ५०० रुपये, आंब्यासाठी १ लाख २१ हजार रुपये, डाळिंबसाठी १ लाख ४३ हजार रुपये, चिकूसाठी ५५ हजार रुपये, पेरूसाठी ६० हजार ५०० रुपये,  लिंबासाठी ७७  हजार रुपये, सीताफळासाठी ५५ हजार रुपये, बोरासाठी ३३ हजार रुपये, पपईसाठी ४४ हजार रुपये, आवळ्यासाठी ४४ हजार रुपये, तुती लागवडीसाठी प्रतिहेक्टरी १ लाख १० हजार रुपये, पानमळ्यांसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.

फुलशेतीमध्ये झेंडूसाठी प्रतिहेक्टरी ४४ हजार रुपये, गुलाबासाठी ५५ हजार रुपये, मोगरा, जाईसाठी ४३ हजार ६०० रुपये याप्रमाणे कर्ज दिले जाईल. संरक्षित शेतीमध्ये प्रतिदहा गुंठे क्षेत्रासाठी गुलाब ४ लाख २६ हजार रुपये, जरबेरा, कार्नेशनसाठी ६१ हजार रुपये, सिमला मिरचीसाठी १ लाख ४० हजार रुपये याप्रमाणे कर्ज दर निश्चित करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...