Agriculture News in Marathi, AGROWON, Pest attack on Sugarcane | Agrowon

हुमणी, पांढऱ्या माशीचा उसाला पडलाय विळखा
राजकुमार चौगुले
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

''कोल्हापूर, सांगलीच्या सीमाभागावरील वारणा पट्ट्यात हुमणी (होलोट्रिकिया सेराटा) सत्तर टक्के क्षेत्रावर आली आहे. माळावरची हुमणी असे त्याला संबोधले जाते. फायलोग्नॅथस डायनोसीस ही हुमणी तीस टक्के भागावर आली आहे. याशिवाय या दोन जिल्ह्यांतील इतर भागांत हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन असूनही पिवळा झालेला ऊस पाहावयास मिळत आहे.''
- डॉ. पांडुरंग मोहिते, कीटकशास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग, कोल्हापूर कृषी महाविद्यालय 

कोल्हापूर : राज्यातील बहुतांशी भागातील उसाला यंदा पाऊस लांबल्याचा फटका बसला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात हुमणी आणि पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने हैराण करून सोडले आहे.

प्रतिकूल हवामान, पावसाने दिलेली ओढ व जमिनीत पुरेसा वाफसा नसल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा भागांत हुमणीने उसावर डल्ला मारला आहे. तर नगर, नाशिक, जिल्ह्यातील उसावर पांढऱ्या माशीने आक्रमण केले आहे. परिणामी उसाच्या उत्पादनात सुमारे पंधरा टक्‍क्‍यापर्यंत घट होण्याची शक्‍यता जाणकार व्यक्त करीत आहेत. 

दक्षिण महाराष्ट्रात अस्वस्थता...
दक्षिण महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसमोर संकटाची मालिका सुरू झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत हुमणीने ऊस फस्त करण्यास सुरवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी उसाच्या प्लॉटवर वेगवेगळ्या प्रकारची हुमणी अळी आढळून येत आहे. पाऊस नसल्याने कोरड्या झालेल्या जमिनीत हुमणी जास्त प्रमाणात आढळून येत आहे.

सोलापूर भागातही एकूण उसाच्या पाच ते दहा टक्के उसावर हुमणीचा प्रादुर्भाव आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यानेच हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही प्रमाणात उपायांनी हुमणीचे नियंत्रण करणे शक्‍य असले, तरी तरी मोठा पाऊसच हुमणीचे नैसर्गिक नियंत्रण करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे शेतकऱ्याला आता पावसाचा धावा केल्याशिवाय पर्यायच उरला नाही. 

प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम
राज्यातील ऊस पट्ट्यामध्ये नगर व नाशिक जिल्ह्यांतील गोदावरी नदीकाठच्या भागाचा समावेश होतो. या भागात प्रत्येक वर्षी काही प्रमाणात रोग किडींचा प्रादुर्भाव असतो. यंदा मात्र ठळकपणे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव या भागातील उसावर झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. केवळ उपलब्ध पाण्याच्या स्रोतावर उसाचे पीक व्यवस्थीत येईल याची खात्री देता येत नाही.

यंदा पावसाने उशिरा सुरवात केली. यातच बहुतांशी दिवस पावसाळी हवामान नव्हतेच. कडक ऊन, ढगाळ हवामान असल्याने याचा प्रतिकूल परिणाम उसावर झाला. नगर, नाशिक जिल्ह्यांतील उसालाही याचा फटका बसला असल्याचे पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातून सांगण्यात आले. या भागात हुमणीचा प्रादुर्भाव फारसा नसला तरी पांढरी माशी मात्र बहुतांशी ठिकाणी आढळत आहे.

अनुकूल हवामानात किडींचा जास्त उद्रेक
प्रतिकूल हवामान, अनियमित पाऊस, पिकाला पाण्याचा ताण पडणे, खतांची असमतोल मात्रा दिली गेल्यास अशा दुय्यम किडींचा जास्त उद्रेक होण्याची शक्‍यता असते. ऊस लागवडीनंतर ३ महिन्यांपासून ऊस तुटेपर्यंत कोणत्याही अवस्थेमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून येतो.

पांढऱ्या माशीच्या दोन प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. त्यापैकी ॲलियुरोलोबस्‌ बॅरोडेन्सिस्‌ ही पांढरी माशी जास्त प्रमाणात आढळून येते. सध्या नगर, नाशिक भागांत याचा प्रादुर्भाव जास्त आहे. जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ८० टक्‍क्‍यांपर्यंत म्हणजे (१७ कोष प्रतिचौरस इंच) असेल तर ऊस उत्पादनामध्ये २३ ते २४ टक्के व साखर उत्पादनामध्ये २.९ युनिटने घट येते, असे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. मंगेश बडगुजर यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून...अंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील...
‘जलयुक्त’मधून खंदर माळवाडीचं शिवार झालं...शेतकऱ्यांनी निवडली व्यावसायिक पीकपद्धती नगर...
नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील...नाशिक : जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२०)...
राबवा ‘आत्महत्या रोखा अभियान’ कर्जे थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकांनी त्रास...
‘पोल्ट्री’तील संधी ओळखासध्या शेतमालाच्या दराचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे....
द्राक्षावर रोगांचा धोका वाढलासर्व द्राक्ष विभागामध्ये गेले दोन तीन दिवसांमध्ये...
मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद,...
‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर...राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का नागपूर...
दूध संघांना सावरण्यासाठी त्रिसदस्यीय... विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण :...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३०...