agriculture news in Marathi, agrowon, polling machines 'fail' in Bhandara-Gondiya | Agrowon

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे 'फेल'
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

भंडारा  ः नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी सोमवारी (ता. २८) पोटनिवडणूक घेण्यात आली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात याकरिता मतदानाची प्रक्रिया पार पडली. परंतु, या प्रक्रियेत तब्बल ८० टक्‍के ईव्हीएम मशिन बंद पडल्याने विरोधकांनी फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. 

भंडारा  ः नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी सोमवारी (ता. २८) पोटनिवडणूक घेण्यात आली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात याकरिता मतदानाची प्रक्रिया पार पडली. परंतु, या प्रक्रियेत तब्बल ८० टक्‍के ईव्हीएम मशिन बंद पडल्याने विरोधकांनी फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. 

भाजपच्या धोरणाला कंटाळत तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या या जागेसाठी सोमवारी (ता. २८) मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे तर भाजपचे हेमंत पटले यांच्यात सरळ लढत आहे. परंतु, मतदानाच्या दिवशी गोंदिया जिल्ह्यातील तीन तर भंडारा जिल्ह्यातील पाचही तालुक्‍यांत मतदान यंत्रात बिघाडाचे प्रकार घडले. त्यामुळे मतदारांचा उत्साह असताना आलेल्या या अडचणींमुळे मतदारांचा हिरमोड झाला आणि बहुतांश मतदार घरी परतले. 

मतदानाच्या टक्‍केवारीवर याचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. भंडारा जिल्ह्यात दुपारपर्यंत अवघे २२ टक्‍के मतदान झाले होते. अनेक केंद्रावर मतदान यंत्र दुरुस्त झाल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा बंद पडत होते. प्रत्येक तालुक्‍यात केवळ एक इंजिनियर असल्याने त्याला एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर पोचण्यास दीड ते दोन तासांचा वेळ लागत होता. या कालावधीत मतदानाची प्रक्रिया ठप्प पडत असल्याने मतदारांचा हिरमोड होत ते आल्या पावली परत असल्याचे चित्र बहुतांश केंद्रावर होते.

पालघरमध्येही ईव्हीएमचा गोंधळ
पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी  सोमवारी (ता. २८) मतदान पार पडले. या ठिकाणी संध्याकाळी तीन वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान अनेक केंद्रांवर ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या. तर बंद यंत्रे बदलून दिल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, यावरून दिवसभर गोंधळ होता. पालघरची ही निवडणूक भाजप व शिवसेनेने खूपच प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकाचा जोरदार प्रचार केला होता. या दोघांबरोबरच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचेही आव्हान तगडे होते. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यातच खऱ्या अर्थाने सामना रंगला होता. या ठिकाणी ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

सुरतमधूनच 'ईव्हीएम' का आणल्या? 
राज्यात फक्त दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत्या. त्यामुळे बाहेरून ईव्हीएम मशिन मागवण्याची गरज नव्हती. तरीही सुरतमधून ईव्हीएम मशिन का मागवल्या, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. आज सकाळपासून भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळेतच ईव्हीएम मशिन बिघाडाच्या तक्रारी येण्यास सुरवात झाली. त्याबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटेल म्हणाले, २००० मशिनपैकी जवळपास ३०० मशिनमध्ये बिघाड आहे, भंडारा-गोंदियाचे तापमान सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. या उच्च तापमानामुळेच ईव्हीएमच्या सेन्सरमध्ये बिघाड होत आहे, असे कारण अधिकारी सांगत आहेत. अशा प्रकारे बिघाड होत असल्यास ईव्हीएमची विश्वासार्हता कशी मान्य करायची असा प्रश्नही पटेल यांनी केला.

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...