agriculture news in Marathi, agrowon, pomegranate rate increased by 20 to 30 rupees | Agrowon

हस्त बहारातील डाळिंबाला २० ते ३० रुपयांनी अधिक दर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

सांगली  ः राज्यातील मृग, हस्त बहारातील डाळिंब संपली आहेत. सध्या उशिरा हस्त बहरातील डाळिंब बाजारपेठेत दाखल झाली आहेत. गतवर्षी याच हंगामातील डाळिंबाला ७० ते ८० रुपये असा दर होता. यंदाच्या उशिरा हस्त बहारातील डाळिंबाला २० ते ३० रुपये अधिक दर म्हणजे प्रति किलोस ९० ते ११० रुपये असा दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगली  ः राज्यातील मृग, हस्त बहारातील डाळिंब संपली आहेत. सध्या उशिरा हस्त बहरातील डाळिंब बाजारपेठेत दाखल झाली आहेत. गतवर्षी याच हंगामातील डाळिंबाला ७० ते ८० रुपये असा दर होता. यंदाच्या उशिरा हस्त बहारातील डाळिंबाला २० ते ३० रुपये अधिक दर म्हणजे प्रति किलोस ९० ते ११० रुपये असा दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील सुमारे २५ टक्के डाळिंब उत्पादक शेतकरी उशिरा हस्त बहारातील डाळिंब पीक घेतात. या बहरात डाळिंबाला अधिक दर मिळतो. गेल्यावर्षी पाऊस आणि वातावरण चांगले होते. यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात वाढ झाली होती. यामुळे उशिरा हस्त बहारातील डाळिंबाच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. मात्र, यंदा उशिरा पाऊस, दिवाळीनंतर अवकाळी पावसाचा फटका डाळिंबाला बसला. त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता असून यामुळे डाळिंबाच्या दरात तेजी आली आहे. 

सध्या डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्यातच डाळिंबाच्या उत्पादनात घटीची शक्‍यता आहे. यामुळे उशिरा हस्त बहारातील डाळिंबाचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत डाळिंबाची विक्री करण्याऐवजी थेट बांधावरच विक्री करण्यास पसंती देत आहेत. डाळिंबाची खरेदी करण्यासाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी होत असल्याने डाळिंबाला प्रतिकिलोस सरासरी १०० रुपये इतका दर मिळू लागला आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...