agriculture news in Marathi, agrowon, power tariff for agriculture issue discus in in the Cabinet | Agrowon

कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून मंत्र्यांमध्ये खडाजंगी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी वीजबिल थकबाकीवरून मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. 

शेतकऱ्यांकडून वीजबिलाचा भरणा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मुनगंटीवार यांनी थकबाकी अशीच राहिली तर ऊर्जा प्रकल्पांना अपेक्षित निधी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना थकबाकीमुळे वीज खंडित केली तर त्याचे दुष्पारिणाम होतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी वीजबिल थकबाकीवरून मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. 

शेतकऱ्यांकडून वीजबिलाचा भरणा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मुनगंटीवार यांनी थकबाकी अशीच राहिली तर ऊर्जा प्रकल्पांना अपेक्षित निधी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना थकबाकीमुळे वीज खंडित केली तर त्याचे दुष्पारिणाम होतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

राज्य मंत्रिमंळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. या प्रस्तावाची माहिती बैठकीत दिली जात असताना मुनगंटीवार यांनी प्रणालीसाठी येणारा खर्च जास्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी खर्च वाढत असताना कृषिपंपधारकांकडून वीजबिलांचा भरणा होत नसल्याकडे मुनंगटीवार यांनी लक्ष वेधले. यावर खुलासा करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षाकडून शेतकऱ्यांना उद्देशून होत असलेल्या आवाहनाचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना वीजबिल भरू नका, असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे वीजबिलांचा भरणा होत नाही. शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली करण्यात अडचणीत येत आहेत, असे सांगत बावनकुळे यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

यावर वीजबिल वसुलीची जबाबदारी कशी घ्यायची, ती घ्या पण बिलांचा भरणा झालाच पाहिजे. तो न झाल्यास प्रकल्पांना निधी देणे शक्य नाही, असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. भाजपच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांच्या वादात प्रस्तावावरील चर्चा सुमारे ४५ मिनिटे लांबली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी आवाहन करण्याची सूचना बावनकुळे यांना केली.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...