agriculture news in Marathi, agrowon, Pre plantation of cotton will hit | Agrowon

पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि बियाण्यांसंबंधीच्या अडचणी यामुळे यंदा जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे ४५ हजार हेक्‍टरने कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 

जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि बियाण्यांसंबंधीच्या अडचणी यामुळे यंदा जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड सुमारे ४५ हजार हेक्‍टरने कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कापूस लागवड केली जाते. त्यात सुमारे ९५ हजार ते एक लाख हेक्‍टवर पूर्वहंगामी कापूस असतो. २०१५-१६ मध्ये कापसाला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचे दर होते, तर जूनमध्ये दर ५६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. या बाबी लक्षात घेता चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगरमधील तापीकाठासह पाचोरा, धरणगाव, जळगावच्या गिरणा नदीच्या काठावरील गावांत पूर्वहंगामी कापूस लागवड बऱ्यापैकी झाली होती; परंतु गुलाबी बोंड अळीमुळे डिसेंबर व जानेवारीतच पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करण्याची वेळ आली. 

फरदड कापसाचे उत्पादन अनेक शेतकरी घेऊ शकले नाहीत. त्यातच कापसाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर पुन्हा मशागत, बियाणे, पेरणीची मजुरी असा खर्च करून शेतकऱ्यांना रब्बी पिके घ्यावी लागली. मोठे नुुकसान कापूस उत्पादकांचे झाले. या सर्व बाबी लक्षात घेता यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल. ज्यांच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी ऊस, केळी व इतर फळ, भाजीपाला पिकांना पसंती दिल्याची माहिती मिळाली आहे. 
बियाणेही नाही वेळेत
यंदा कापसाचे बियाणे २० मेनंतर येणार आहे. ते वेळेत आले असते तर पूर्वहंगामी कापूस लागवड २० मेपर्यंतच अनेक शेतकऱ्यांनी उरकून घेतली असती; परंतु कापूस बियाणे मेनंतर येईल. त्याचे वितरण वेळेत होते की नाही, हादेखील प्रश्‍न आहे. म्हणजे लागवडीला आणखी आवडाभर उशीर झाला तर जूनमध्येच खऱ्या अर्थाने शेतकरी लागवडीस पसंती देतील. 

कापूस बियाणे पुरवठ्याचा मुद्दा हा शासनाचा विषय आहे; परंतु गुलाबी बोंडअळी निर्मूलन मोहिमेसंबंधी शासनाने कार्यवाही हाती घेतली आहे. कापसाचे क्षेत्र १२ ते १३ टक्‍क्‍यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...