agriculture news in Marathi, agrowon, to prevent bollworm agriculture univercity Give bio control mechanism | Agrowon

बोंड अळी रोखण्यासाठी ‘पंदेकृवि’ देणार बायो कंट्रोल तंत्र
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

अकोला  ः अागामी हंगामात कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे ‘बायो कंट्रोल’ तंत्र पोचविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. नुकतीच मुंबईत राज्यस्तरीय खरीप अाढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी याबाबत सविस्तर माहिती सादर केली.

अकोला  ः अागामी हंगामात कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे ‘बायो कंट्रोल’ तंत्र पोचविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. नुकतीच मुंबईत राज्यस्तरीय खरीप अाढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी याबाबत सविस्तर माहिती सादर केली.

गेल्या हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. कीडनाशकांची फवारणी करताना काही शेतकऱ्यांना विषबाधा होऊन जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत सर्वच स्तरावर बोंड अळीचा मुद्दा चर्चेत अालेला अाहे. बोंड अळीला अटकाव घालण्यासाठी विविध उपाययोजना शोधल्या जात अाहेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कापूस हे वर्षानुवर्षे महत्त्वाचे पीक अाहे. यासाठी यंदा विद्यापीठाने पुढाकार घेतला अाहे.

डॉ. भाले म्हणाले, बोंड अळीचा जीवनक्रम हा टप्प्याटप्‍याने पूर्ण होतो. पतंग अवस्थेतून अळी तयार होते. या पतंगाला पहिल्याच स्थितीत शोधण्यासाठी लाइट ट्रॅप, फेरोमन ट्रॅपचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल. एकरी पाच ते सहा ट्रॅप लावले तर प्रादुर्भाव अोळखता येईल. असे ट्रॅप मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे काम यंत्रणांकडून केले जाणार अाहे.

या ट्रॅपसाठी अत्यल्प खर्च लागतोदुसरी उपाययोजना निमअर्काचा वापर हा अाहे. दहा-दहा दिवसांच्या अंतराने निमअर्क फवारणी केली, तर या अळीचा पतंग अंडी घालणार नाही. बायो फंगसची फवारणी करण्यासाठीसुद्धा प्रोत्साहित केले जाईल. बायो फंगस फवारले तर ते अळीवर उपजिविका करून तिला नष्ट करेल. ट्रायकोकार्डचा वापर करण्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार अाहे. 

या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांना विद्यापीठाचे तज्ज्ञ प्रशिक्षण देतील. मागील हंगामात ४०० तरुणांना प्रशिक्षित केले असून, त्याचे चांगेल रिझल्ट अालेले अाहेत. विद्यापीठांतर्गत असलेले कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी संशोधन केंद्रातील मनुष्यबळाची मदत घेतली जाईल, असेही डॉ. भाले यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...