agriculture news in Marathi, agrowon, The problem of seed production grant In ten days | Agrowon

बीजोत्पादन अनुदानाचा प्रश्‍न दहा दिवसांत मार्गी लावणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018

अकोला (प्रतिनिधी) ः शेतकरी उत्पादक कंपन्यांना बीजोत्पादनासाठी उत्पादन व वितरण अनुदान मिळावे म्हणून शनिवारी (३१ मार्च) खामगाव येथे कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन टाळले. यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेत आपला प्रश्‍न मांडला. येत्या दहा दिवसांत हे अनुदान दिले जाईल, असे आश्‍वासन श्री. फुंडकर यांनी दिले असल्याची माहिती रिसोड तालुक्‍यातील बाळनाथ कंपनीचे विलास गायकवाड यांनी दिली. 

अकोला (प्रतिनिधी) ः शेतकरी उत्पादक कंपन्यांना बीजोत्पादनासाठी उत्पादन व वितरण अनुदान मिळावे म्हणून शनिवारी (३१ मार्च) खामगाव येथे कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन टाळले. यानंतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेत आपला प्रश्‍न मांडला. येत्या दहा दिवसांत हे अनुदान दिले जाईल, असे आश्‍वासन श्री. फुंडकर यांनी दिले असल्याची माहिती रिसोड तालुक्‍यातील बाळनाथ कंपनीचे विलास गायकवाड यांनी दिली. 

वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, गटांनी गेल्या हंगामात उत्पादित केलेल्या बीजोत्पादनासाठीचे उत्पादन व वितरण अनुदान थकले होते. शासनाने ऐनवेळी हे अनुदान न देण्याबाबत परिपत्रक काढल्याने या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. आर्थिक अडचणीत आलेल्या कंपनी संचालकांनी तालुक्‍यापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला.

तसेच मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडे निवेदने दिली. मागणीसाठी ३१ मार्च रोजी खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखले. त्यानंतर काही प्रतिनिधींनी कृषिमंत्री श्री. फुंडकर यांची भेट घेतली. 

या बैठकीत थकीत अनुदानाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. मंत्र्यांनी आगामी दहा दिवसांत हा प्रश्‍न मार्गी लावल्या जाईल, त्यादृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. सुमारे ५५ लाख रुपये अनुदान सध्या थकलेले आहे. हे अनुदान मंत्र्यांच्या आश्‍वासनाप्रमाणे दहा दिवसांत मिळाले नाही तर पुन्हा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. 
 

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...