रेशीम कोष उत्पादन दुप्पटीने वाढले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : रेशीम कोष उत्पादनात मराठवाड्याने आघाडी घेतली आहे. गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा रेशीम कोष उत्पादन जवळपास दुप्पटीने वाढले असून अंडीपुंजी वाटपही दुप्पटीपेक्षा जास्त झाले आहे. 

मराठवाड्यात ५०५६ एकरवर रेशीम उद्योग विस्तारला आहे. जवळपास ४,७६५ शेतकरी यामध्ये सहभागी असून गतवर्षी २०१६-१७ मध्ये मराठवाड्यात ९ लाख ७ हजार ३५० अंडीपुंजीचे वाटप करण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत हे अंडीपुंजी वाटप १९ लाख ७६ हजार ३२५ वर पोहचले आहे. गतवर्षी मराठवाड्यात ४९८.१२२ मेट्रीक टन कोषाचे उत्पादन झाले होते. 

यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंत हे उत्पादन ९७८.१८६ मेट्रीक टनावर पोहचले आहे. बीड जिल्ह्याने कोष उत्पादनात आघाडी घेतली असून सर्वाधिक २७५ मेट्रीक टन कोषाचे उत्पादन बीड जिल्ह्यात झाले आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात २१८ मेट्रीक टन, औरंगाबाद जिल्ह्यात ७२ मेट्रीक टन, उस्मानाबाद जिल्ह्यात १५४ मेट्रीक टन, हिंगोली जिल्ह्यात ६१ मेट्रीक टन, लातूर जिल्ह्यात ४६ मेट्रीक टन, नांदेड जिल्ह्यात ७९ मेट्रीक टन तर परभणी जिल्ह्यात ६९ मेट्रीक टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले आहे. 

बीडमध्ये सर्वाधिक अंडीपुंजी वाटप रेशीम कोष उत्पादनात आघाडी घेणाऱ्या बीड जिल्ह्यात अंडीपुंजींचेही सर्वाधिक वाटप करण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात ५ लाख ७० हजार ७००, औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ५५ हजार ८००, हिंगोली जिल्ह्यात ९१ हजार २००, जालना जिल्ह्यात ४ लाख ८ हजार ८००, लातूर जिल्ह्यात १ लाख ३१ हजार, नांदेड जिल्ह्यात १ लाख ४४ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात २ लाख ७४ हजार तर परभणी जिल्ह्यात १ लाख ९९ हजार अंडींपुंजीचे वाटप करण्यात आले होते.

१० हजार एकरावर नोंदणी रेशीमविषयक केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नुकतेच महारेशीम अभियान हाती घेण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १० हजार ५७ एकरांवर तुती लागवडीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. येत्या जूननंतर प्रत्यक्ष तुती लागवडीला सुरवात होणे अपेक्षित आहे. राज्यात १७ हजार ६६७ एकराची महारेशीम अभियानाच्या माध्यमातून नोंदणी झाली. त्यापैकी मराठवाड्याचा वाटा ५६ टक्‍के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com