agriculture news in Marathi, agrowon, production of sugar increased | Agrowon

राज्यात ऊसगाळप साडेपाच कोटी टनांनी वाढले
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सातारा  ः राज्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५ कोटी ५७ लाख ५७ हजार टन उसाचे, तर ६ कोटी २२ लाख क्विंटलने साखर उत्पादन वाढले आहे. राज्यात मंगळवारअखेर (ता. १०) नऊ कोटी ३० लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून १० कोटी ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

सातारा  ः राज्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ५ कोटी ५७ लाख ५७ हजार टन उसाचे, तर ६ कोटी २२ लाख क्विंटलने साखर उत्पादन वाढले आहे. राज्यात मंगळवारअखेर (ता. १०) नऊ कोटी ३० लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून १० कोटी ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 

राज्यात इतर पिकांच्या तुलनेत ऊसाला शाश्‍वत दर मिळत असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, राज्यात ऊस गाळपासह साखरेच्या उत्पादनही दुपटीपेक्षा जास्त वाढले आहे. यंदा राज्यातील १८७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या कारखान्यांच्या नऊ कोटी ३० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून १० कोटी ४१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

गतवर्षी १० एप्रिलअखेर ३ कोटी ७२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ४ कोटी १८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ५ कोटी ५७ लाख मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले, तर ६ कोटी २२ लाख क्विंटल साखर उत्पादनात वाढ झाली आहे. सर्वांत जास्त साखर उतारा कोल्हापूर विभागात १२.४२ टक्के, तर सर्वांत कमी औरंगाबाद विभागात ९.९२ टक्के मिळाला आहे. राज्यात हंगाम सुरू केलेल्या १८७ पैकी १२६ कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली आहे.

अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने या हंगामाचे दिवस लांबणार असून, ६१ कारखान्यांचा गाळप सुरू असून, यातील अनेक कारखान्यांच्या हंगाम एप्रिलअखेरपर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे. 

साखरेच्या दरावर परिणाम 
गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनातील आकडे वाढले आहेत. याचा परिणाम साखरेच्या दरावर होणार आहे. साखरेच्या दरातील घसरणीमुळे जाहीर केलेल्या हप्ताच्या रकमेत कपात केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...