स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त शनिवारी कार्यक्रम 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थान मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शनिवारी (ता.१४)  श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४० वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. 

पुण्यतिथीदिनी शनिवारी पहाटे दोन वाजता काकड आरती होईल. पहाटे तीन ते पाच या वेळेत नगरप्रदक्षिणा पार पडेल. देवस्थानच्या वतीने श्रींना पारंपरिक लघुरुद्र सकाळी सहा वाजता करण्यात येईल. सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या भजनाने देवस्थानच्या ज्योती मंडपात नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा सकाळी सात वाजता होईल.

स्वामी भक्तांच्या वतीने नित्य नियमाने होणारे अभिषेक भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता बंद ठेवण्यात येतील. सकाळी ११.३० वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा महानैवेद्य श्रींना दाखविण्यात येईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com