agriculture news in Marathi, agrowon, Promotional officer exchange their place | Agrowon

पदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात बदलले बदलीचे ठिकाण
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

नागपूर  : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक असलेल्या पदोन्नतीवरील २९ कृषी अधिकाऱ्यांनी गॉडफादरच्या मदतीने कर्तव्यावर रुजू न होताच हातोहात बदलीचे ठिकाण बदलल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घडामोडीमुळे कृषी विभागही चक्रावून गेला आहे. 

नागपूर  : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक असलेल्या पदोन्नतीवरील २९ कृषी अधिकाऱ्यांनी गॉडफादरच्या मदतीने कर्तव्यावर रुजू न होताच हातोहात बदलीचे ठिकाण बदलल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घडामोडीमुळे कृषी विभागही चक्रावून गेला आहे. 

उन्हाच्या तीव्रतेबाबत विदर्भाचा राज्य, तसेच देशपातळीवर पहिला नंबर लागतो. त्यासोबतच येथील अनेक विभागांत कमिशनच्या अपेक्षेने राजकीय हस्तक्षेपदेखील वाढता आहे. परिणामी विदर्भ वगळता मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रातील अधिकारी या भागात काम करण्यास अनुत्सुक असतात. नुकत्याच घडलेल्या एका घडामोडीने याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.

मुख्यमंत्री, कृषी, अर्थ आणि ऊर्जा अशी सारी सत्ता केंद्र असलेल्या विदर्भात कृषीची ७० टक्‍के पदे रिक्‍त आहेत. अशा स्थितीत बदलीपात्र कर्मचारीदेखील या भागात रुजू होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारभार कसा चालवावा, असा प्रश्‍न पडला आहे. हतबल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी थेट कृषी आयुक्‍तालयाने हस्तक्षेप करीत या कर्मचाऱ्यांना सक्‍तीने रुजू करण्यास सांगावे, अशी मागणी केली आहे. 

३३ पैकी चौघे झाले रुजू
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नतीने कृषी अधिकारीपदी नियुक्‍ती मिळाली होती. यातील २० अधिकाऱ्यांना नागपूर विभागात, तर १३ जणांना अमरावती विभागात रुजू होण्याचे आदेश काढण्यात आले. परंतु बहुतांशी पश्‍चिम महाराष्ट्रातील असलेल्या या कृषी अधिकाऱ्यांनी रुजू न होताच आपआपल्या भागातील गॉडफादरच्या मदतीने हातोहात बदली आदेश बदलून घेतले. नागपूर विभागात २० पैकी एक महिला कृषी अधिकारी रुजू झाली. ती गडचिरोलीची रहिवासी असल्याने रुजू झाल्याचे सांगितले जाते. अमरावती विभागात १३ पैकी ३ अधिकारी रुजू झाले; रुजू झालेले हे तीनही अधिकारी याच भागातील असल्याने रुजू झाले, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...