पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावे

पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावे
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावे

पुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कृषी विभागाने पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचा पंचानामा करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. पावसाने ओढ दिल्यास किंवा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवल्यास बियाणे उपलब्धता, पीक नियोजन याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली माॅन्सूनपूर्व तयारीबाबत आढवा बैठक बुधवारी (ता. २३) आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्हापूर यांचे प्रतिनिधी, मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग पुणे, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे, मुख्य अभियंता विद्युत ग्रामीण कोल्हापूर, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर व पुणे, उपनियंत्रक नागरी संरक्षणदल, प्रादेशिक  उपसंचालक नगरपालिका प्रशासन पुणे अधिकारी हे उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. वीज खंडित होते. धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग केले जातो, त्या वेळी धरणाखालील गावांना धोका होऊ शकतो. तसेच पावसामुळे घरांची पडझड होते. अशा परिस्थितीत त्या- त्या यंत्रणेने सतर्क राहून लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा संबंधित विभागाने आपापली जबाबदारी पार पाडावी. 

तसेच विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांचे स्तरावर केलेल्या उपाययोजनांची माहिती देत विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू केले असून, नियंत्रण कक्षांत अधिकरी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२० -२६३४०५३४आहे. पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून धरणातून पाणी विसर्ग करण्यापूर्वी आवश्यक ती प्रसिद्धी देऊन संबंधित विभागांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दिल्या.

पाटबंधारे विभागातर्फे www.rtsfros.com ही वेबसाइट विकसित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील लहान तलावांच्या बाबतीत काळजीपूर्वक उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे कार्यक्षेत्रातील ज्या पुलाचे ठिकाणी सेन्सर बसविण्यात आलेले नाहीत, अशा ठिकाणी चोवीस तास देखरेखीकरिता गँगमनची नेमणूक करावी, पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाच्या पाण्याने सुरवातीचे दोन ते तीन आठवड्यामध्ये दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने कटाक्षाने घ्यावयाची आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्यसे दूषित पाणी मिसळणार नाही, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com