agriculture news in Marathi, agrowon, Proper planning should be done if rain late | Agrowon

पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कृषी विभागाने पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचा पंचानामा करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. पावसाने ओढ दिल्यास किंवा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवल्यास बियाणे उपलब्धता, पीक नियोजन याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

पुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कृषी विभागाने पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचा पंचानामा करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. पावसाने ओढ दिल्यास किंवा दुबार पेरणीची परिस्थिती उद्भवल्यास बियाणे उपलब्धता, पीक नियोजन याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली माॅन्सूनपूर्व तयारीबाबत आढवा बैठक बुधवारी (ता. २३) आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, व कोल्हापूर यांचे प्रतिनिधी, मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग पुणे, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे, मुख्य अभियंता विद्युत ग्रामीण कोल्हापूर, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर व पुणे, उपनियंत्रक नागरी संरक्षणदल, प्रादेशिक  उपसंचालक नगरपालिका प्रशासन पुणे अधिकारी हे उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. वीज खंडित होते. धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग केले जातो, त्या वेळी धरणाखालील गावांना धोका होऊ शकतो. तसेच पावसामुळे घरांची पडझड होते. अशा परिस्थितीत त्या- त्या यंत्रणेने सतर्क राहून लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. तेव्हा संबंधित विभागाने आपापली जबाबदारी पार पाडावी. 

तसेच विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांचे स्तरावर केलेल्या उपाययोजनांची माहिती देत विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू केले असून, नियंत्रण कक्षांत अधिकरी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२० -२६३४०५३४आहे. पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून धरणातून पाणी विसर्ग करण्यापूर्वी आवश्यक ती प्रसिद्धी देऊन संबंधित विभागांना सतर्कतेचा इशारा द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दिल्या.

पाटबंधारे विभागातर्फे www.rtsfros.com ही वेबसाइट विकसित करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील लहान तलावांच्या बाबतीत काळजीपूर्वक उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे कार्यक्षेत्रातील ज्या पुलाचे ठिकाणी सेन्सर बसविण्यात आलेले नाहीत, अशा ठिकाणी चोवीस तास देखरेखीकरिता गँगमनची नेमणूक करावी, पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाच्या पाण्याने सुरवातीचे दोन ते तीन आठवड्यामध्ये दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने कटाक्षाने घ्यावयाची आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्यसे दूषित पाणी मिसळणार नाही, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

इतर बातम्या
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
पाणीउपशावर नियंत्रण आवश्यक ः राजाराम...नाशिक : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
करमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्जकरमाळा, जि. सोलापूर  : करमाळा कृषी उत्पन्न...
द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला...सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे....
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
बोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा...बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...
तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...
समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...