agriculture news in Marathi, agrowon, proposed to 25 TMC increase water stock in Koyna dam | Agrowon

कोयना धरणातील पाणीसाठा २५ टीएमसीने वाढविण्याचा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई : कोयना धरणामध्ये २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने सरकारकडे सादर केला आहे. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या धरण क्षेत्रातील पुनर्वसित गावांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली.

मुंबई : कोयना धरणामध्ये २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने सरकारकडे सादर केला आहे. परंतु, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या धरण क्षेत्रातील पुनर्वसित गावांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत कोयना धरण प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अनेक गावे पुनर्वसित झालेली आहेत. परंतु पुनर्वसित गावांना सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तसेच कोयना धरणात २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच पुनर्वसित गावांतील शेतकऱ्यांना जमिनी परत मिळालेल्या नाहीत. तसेच मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे शिवसेनेचे प्रतोद व आमदार शंभुराजे देसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, पाटण तालुक्यातील ५४ पुनर्वसित गावांपैकी २१ गावांचे खासगी जागेवर पुनर्वसन झालेले आहे. या गावांना १८ सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतला. परंतु, त्यातील कामांची वर्गवारी केली असता १३ कामे करण्यास अडचणी येत आहे. तसेच कोयना धरणात २५ टीएमसी पाणीसाठा वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून सादर करण्यात आलेला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुनर्वसित गावांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी ३ कोटी २९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून १५ दिवसांत निविदा काढण्यात येतील. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या गावांना सुविधा पुरविल्या जातील. 

मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना अवगत करणार 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, कणकवली, वैभववाडी, मालवण आणि देवगड तालुक्यातील १५ गावांत वणवा पेटल्याने शेतकऱ्यांच्या फळबाग जळून खाक झाल्या. या फळबागांचे पंचनामे करण्यात आले. परंतु वणव्यामुळे नुकसान झालेल्या फळबागांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्यामुळे मदत मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्र्यांना अवगत करून दिले जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वणवा लागून चे झालेले नुकसान याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती.

वसंतराव नाईक सभागृहाचे भूमिपूजन १ जुलै रोजी
हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त नागपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सभागृह उभारण्यासाठी विद्यापीठ परिसरातील पांढरा बोर्ड येथील ७ एकर जमीन महिन्याभरात उपलब्ध करून दिली जाईल. १ जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीला सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन केले जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली. सुनील केदार, अमिन पटेल आदी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...