लातूर जिल्ह्यात सहा लाख हेक्‍टरवर पेरणी प्रस्तावित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

लातूर  : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात ५ लाख ९६ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या १ लाख ११ हजार ११८ क्‍विंटल बियाण्यांची गरज भासणार असून, ७५ हजार ७५० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. उत्पादकता वाढीसाठी येत्या खरीप हंगामात नऊ सूत्रांच्या साहाय्याने भरीव प्रयत्न करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

लातूर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामाचे नियोजन नेमके कसे असेल याचे सादरीकरण अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीपपूर्व आढावा बैठकीत नुकतेच केले. या बैठकीला जिल्हा परिषद, आत्मा, जिल्हा उपनिबंधक, कृषी विज्ञान केंद्र, अग्रणी बॅंक अधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्‍त, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पीक विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

लातूर जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६ लाख ३ हजार हेक्‍टर आहे. गतवर्षी खरिपात सर्वसाधारण क्षेत्रापैकी जवळपास ९८ टक्‍के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामुळे येत्या खरिपात ५ लाख ९६ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित केलेल्या खरिपासाठी १ लाख ११ हजार ११८ क्‍विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. त्यामध्ये ज्वारीचे २८५० क्‍विंटल, बाजरीचे ४६ क्‍विंटल, मकाचे १२२४ क्‍विंटल, तुरीचे ३१५९ क्‍विंटल, मुगाचे १४८५ क्‍विंटल, उडीदाचे १४८५ क्‍विंटल, उडीदाचे १५४४ क्‍विंटल, सूर्यफुलाचे ८० क्‍विंटल, सोयाबीनचे १ लाख ३६० क्‍विंटल, भुईमुगाचे १२० क्‍विंटल, कपाशीचे १०८ क्‍विंटल, भाताचे २०४ क्‍विंटल, तीळाचे १२.५ क्‍विंटल व इतर जवळपास १२५ क्‍विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. त्यापैकी ६५ हजार १०५ क्‍विंटल महाबीजकडून, ४६ हजार १३ क्‍विंटल खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणे अपेक्षित आहे. 

५३ हजार ४६० टन रासायनिक खते लातूर जिल्ह्यात साधारणपणे ५३ हजार ४६० टन रासायनिक खतांचा वापर केला जातो. २०१७-१८ मध्य हा वापर वाढून ५९ हजार २८८ टनांवर पोचला होता. त्या तुलनेत येत्या हंगामासाठी ७५ हजार ७५० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com