agriculture news in Marathi, agrowon, to protection Crops from wildlife Iron fence | Agrowon

वन्यजीवांपासून पिकांच्या संरक्षणासाठी लोखंडी कुंपण
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतपिकांचे, पशुधनाचे नुकसान, मानवी जीवितहानी यांसारख्या समस्या उद्भवतात. यावर उपाय करण्यासाठी वन विभागाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेची व्याप्ती वाढवत वनालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून होणारी अशी हानी टाळण्यासाठी वनांच्या हद्दीवर लोखंडी जाळीचे कुंपण (चेन लिंक फेन्सिंग) उभारण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे निश्चित केले आहे.

मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतपिकांचे, पशुधनाचे नुकसान, मानवी जीवितहानी यांसारख्या समस्या उद्भवतात. यावर उपाय करण्यासाठी वन विभागाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेची व्याप्ती वाढवत वनालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून होणारी अशी हानी टाळण्यासाठी वनांच्या हद्दीवर लोखंडी जाळीचे कुंपण (चेन लिंक फेन्सिंग) उभारण्याची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे निश्चित केले आहे.

याअंतर्गत व्याघ्रप्रकल्पांच्या बफर क्षेत्रात तसेच अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांच्या सीमेपासून ५ किलोमीटरच्या संवदेनशील गावांमध्ये वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी अशा कुंपणाची उभारणी केली जाईल. ज्या ठिकाणी ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती असेल तिथे त्यांच्यामार्फत किंवा जिथे अशा समित्या नसतील तिथे समिती नियुक्त करून ही योजना राबविली जाईल. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या कुंपणांची मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हे कुंपण वनाकडील बाजूने उभारताना एकसंघ किंवा सलग राहील याबाबीला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून, योजनेचे लाभार्थी निवडताना व्याघ्रप्रकल्पांच्या बफर क्षेत्राच्या सीमेवरील तसेच राष्ट्रीय उद्याने, अभयारण्याच्या सीमेवरील अल्प भूधारक शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड केली जाईल.

वनाला लागून असलेल्या काही जमिनी सार्वजनिक उपयोगाच्या असतील (वन जमीन सोडून) तिथे ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती लाभार्थी म्हणून योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेल. जिथे वन जमीन सोडून कमीत कमी १० शेतकऱ्यांची सामूहिकरीत्या सलगतनेने कुंपण करण्याची तयारी असेल आणि तिथे समिती स्थापन झाली असेल तर ही समिती देखील योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेल. योजनेतील अनुदान मिळण्यासाठी सलग क्षेत्राची कमाल लांबी १ हजार मीटर असणे आणि किमान दहा शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या अनुदानासाठी विनंती करणे आवश्यक आहे.

रकमेच्या ९० टक्के अनुदान
या योजनेत कुंपणासाठी लागणाऱ्या रकमेच्या ९० टक्के रक्कम शासकीय अनुदान दिली जाईल. १० टक्के रक्कम सामूहिक लाभार्थ्यांनी भरायची आहे. योजनेसाठी काही नियम निश्चित केले आहेत. ज्यामध्ये या जमिनीवर अतिक्रमण नसावे, या जमिनीवर कमीत कमी १०० रोपे प्रतिहेक्टरी याप्रमाणे साग, बांबू रोपवन घेतलेले असावे, अशा काही अटी आहेत. निवडलेले क्षेत्र वन्यप्राण्यांचे नैसर्गिक भ्रमणमार्गामधील क्षेत्र नसणे आवश्यक आहे. ज्या जमिनीवर कुंपण घालायचे आहे त्या जमिनीचा वापर पुढील १० वर्षे बदलता येणार नाही, असा ठराव समितीने करणे आवश्यक आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...