agriculture news in Marathi, agrowon, Provide enough seeds, fertilizers, for Kharif | Agrowon

खरिपासाठी पुरेसे बियाणे, खते उपलब्ध करून द्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वाशीम : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खतांसाठी कृषी विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना वाशीमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. येथे आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. 

वाशीम : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खतांसाठी कृषी विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना वाशीमचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. येथे आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. 

या प्ररसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीविषयी माहितीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी या वेळी सादरीकरण केले.

श्री. राठोड म्हणाले, खरीप हंगामात पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. तसेच या दरम्यान बोगस बियाणे, खते विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे बोगस बियाणे, खते विक्रेत्यांवर कारवाई करावी. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी पैसा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व बँकांनी पीककर्ज वाटपाला गती देण्याची आवश्यकता आहे. याकरिता जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन सर्व बँक व्यवस्थापकांची विशेष बैठक घेऊन कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच मागेल त्याला शेततळे योजना, फळबाग लागवड योजना, कृषिपंप वीज जोडणीच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

फळबाग लागवडीच्या माध्यमातून कमी पाण्यामध्ये व कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेता येणे शक्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यातील फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना राठोड यांनी या वेळी दिल्या.

तसेच या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणारी नाही, याची दक्षता घ्या. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...