agriculture news in Marathi, agrowon, Provide funds for project seekers | Agrowon

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी निधीची तरतूद करा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनीचे भाडे वाढवावे, अशी सूचना शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्य सरकारला केली. याशिवाय कोयना तसेच कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाला अधिक निधीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबई : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भाडेपट्ट्याने दिलेल्या सरकारी जमिनीचे भाडे वाढवावे, अशी सूचना शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्य सरकारला केली. याशिवाय कोयना तसेच कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाला अधिक निधीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

विधानसभेत राज्याच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. या चर्चेत सहभागी होताना देसाई यांनी सरकारला उत्पन्नवाढीसाठी काही उपाययोजना सूचविल्या. मुंबईसह, पुणे, नागपूर, महाबळेश्वर येथील मोक्याच्या जमिनी सरकारने उद्योग, हॉटेल्सला भाडेपट्ट्याने दिल्या आहेत. भाडेपट्ट्याच्या जमीन भाड्यात दर दोन-पाच वर्षांनी वाढ करण्यात यावी. या दरवाढीतून मिळणारे कोट्यवधीचे उत्पन्न सरकारला विकास कामासाठी वापरता येईल, असे देसाई म्हणाले.

राज्य सरकारने कृष्णा खोरे विकासाची कामे सुरू केली आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद नाही. ६० ते ७० वर्ष उलटूनही कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न कायम आहेत. पुनर्वसनासह नागरी सुविधांच्या मागणीसाठी कोयना प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मदत आणि पुनर्वसन विभागाला अधिकची तरतूद केली तर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पेयजल टप्पा दोनच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद कमी आहे. केंद्राच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा आराखडा मोठा आहे. हा आराखडा अंमलात येण्यासाठी २०२१ किंवा २०२२ हे वर्ष उजाडेल. त्यामुळे मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी अर्थसंकल्पात अधिकची तरतूद करावी. आता तरतूद करणे शक्य नसेल तर जुलैमधील अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या पुरवणी मागणीत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली. 

वीजजोडणीकडे लक्ष द्यावे
कृषिपंपाच्या वीजजोडणीवरून राज्यात असमतोल निर्माण झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यात डिसेंबर २०१७ पर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील डिसेंबर २०१४ पर्यंतचे वीजजोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

इतर ताज्या घडामोडी
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...