खरिपात पुणे जिल्हा बँकेकडून ६४ टक्के पीक कर्जवाटप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : यंदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यात असलेल्या २६२ शाखांमधून एक लाख ४३ हजार ३९० सभासद शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बँकेने खरीप हंगामात ठेवलेल्या एक हजार ५४७ कोटी ८४ लाख ५८ हजार रुपयांपैकी एक हजार २ कोटी ९३ लाख ९१ हजार रुपयांचे म्हणजेच ६४.८० टक्के पीककर्जाचे वाटप केल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बँकेने खरीप हंगामात निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये, म्हणून नाममात्र व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यातून शेतकरी खरीप हंगामात लागणारे बियाणे, खते यासह नांगरणी अशा विविध कारणासाठी कर्जाचा उपयोग करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीच्या वेळी सहकारी बँकेची मोठी मदत होती.

चालू आर्थिक वर्षांसाठी बँकेने शेतीसाठी दोन हजार २०६ कोटी ७० लाख ५४ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगामात वाटप करणाऱ्या पीक कर्जाचा समावेश असून त्या त्या हंगामात या पीककर्जाचे वाटप केले जाणार होते. चालू वर्षी खरिपात टोमॅटो पिकासाठी सर्वाधिक पीककर्जाचे वाटप केले आहे. जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे चालू वर्षीही मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात ७६ हजार ९७१ सभासदांनी ६७ हजार ३४४ हेक्टरसाठी ४६८ कोटी १ लाख ४५ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकासाठी सर्वाधिक पीक कर्ज घेतले आहे. सुमारे २३ हजार ६३१ सभासदांनी १९ हजार ५६९ हेक्टरसाठी १४५ कोटी २१ लाख ९ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यापाठोपाठ पुरंदर, आंबेगाव, खेड, बारामती, भोर, शिरूर, हवेली तालुक्यातही टोमॅटो पिकासाठी

मोठ्या प्रमाणात पीककर्जाचे वाटप उसासाठी तीस हजार सभासद शेतकऱ्यांना सुमारे २९ हजार ९७५ हेक्टरसाठी २८९ कोटी ७५ लाख ९६ हजार रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले आहे. याशिवाय कांदा, बटाटा, फळबाग, केळी, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, ज्वारी, बाजरी, भूईमूग या पिकांनाही मोठ्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले आहे.

नवीन २८१९ शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप यंदा पुणे जिल्ह्यात बँकेकडे नवीन सभासद झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार ८१९ शेतकऱ्यांना १३ कोटी ५५ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप केले आहे. यामध्ये शिरूरमधील ११८४ सभासद, खेडमधील ४६७, मावळ ३५७, पुरंदर ३२६, आंबेगाव १२४, इंदापूर १३०, भोर ८०, हवेली ५६, दौंड ३६, बारामती ३२, मुळशीतील २७ सभासद नवीन शेतकऱ्यांना वाटप केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com