agriculture news in marathi, agrowon, pune district bank, padmvibhushan sharad pawar agri exhibition, pune district | Agrowon

पुणे जिल्हा बँकेच्या शताब्दी वर्षाचा रविवारी सांगता सोहळा
संदीप नवले
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पुणे ः पुणे जिल्हा बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त येत्या रविवारी (ता. १०) सांगता सोहळा व ‘पद्मविभूषण शरदचंद्र पवार कृषी प्रदर्शन’ आयोजित केले आहे. हा सोहळा शिवाजीनगर येथील सिंचननगर (कृषी महाविद्यालयाचे मैदान) येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. 

या सोहळ्याचे उद्‍घाटन अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे ः पुणे जिल्हा बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाले. यानिमित्त येत्या रविवारी (ता. १०) सांगता सोहळा व ‘पद्मविभूषण शरदचंद्र पवार कृषी प्रदर्शन’ आयोजित केले आहे. हा सोहळा शिवाजीनगर येथील सिंचननगर (कृषी महाविद्यालयाचे मैदान) येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. 

या सोहळ्याचे उद्‍घाटन अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रमास सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजयकुमार भोसले, बँकेचे संचालक आमदार दिलीप वळसे पाटील, अजित पवार, दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व संचालक, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे आदी उपस्थित राहणार आहेत. 

रविवार आणि सोमवार असे दोन दिवस चालणाऱ्या पद्मविभूषण शरदचंद्र पवार कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शन सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले राहणार असून, शेतकऱ्यांना विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनातून घेता येणार आहे.

शताब्दीनिमित्त लक्ष्मी रोड शाखा ते कार्यक्रम स्थळापर्यंत सहकार दिंडीचे आयोजन केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. या वेळी  उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या ३५ सहकारी संस्थांना पुरस्काराने गौरविण्यात करणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संजयकुमार भोसले यांनी  दिली.

टॅग्स

इतर इव्हेंट्स
पुणे जिल्हा बँकेच्या शताब्दी वर्षाचा...पुणे ः पुणे जिल्हा बँकेला शंभर वर्षे पूर्ण...
जागतिक अन्नपूर्णा प्रदर्शनात झळकणार...केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव...
ॲग्रोवन शुभलाभ बक्षीस योजनेस धडाक्यात...पुणे : लाखोंच्या हिऱ्यांसह पेरणी यंत्र, ठिबक संच...
ॲग्रोवन द्राक्ष डाळिंब प्रदर्शनाचा...नाशिक : आव्हानात्मक परिस्थितीतही शेती करणाऱ्या...
नाशिकला शुक्रवारपासून द्राक्ष-डाळिंब...पुणे : द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना...