पुणे विभागातील पाणीसाठा ५८.३१ टक्क्यांवर

पुणे विभागातील पाणीसाठा ५८.३१ टक्क्यांवर

पुणे : पुणे विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या ७२५ प्रकल्पांमध्ये मिळून ५३७.४४ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. सोमवारपर्यंत सर्व धरणांमध्ये ३१३.३९ टीएमसी (५८.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. उन्ह वाढल्याने पाण्याची मागणी वाढून पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. 

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमध्ये गतवर्षी मार्च महिन्यात ४१.३३ टक्के पाणी साठा होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक पाणीसाठा अाहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणामध्ये ३८.४४ टीएमसी (७१.८० टक्के ) उपयुक्त पाणी साठा आहे. तर उजनी धरणाच्या अचल साठ्यातील पाणी विचारात घेता उजनीत १०२.१० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध अाहे. तर कोयना धरणात ६७.१७ टीएमसी (६७.०९ टक्के) पाणी शिल्लक अाहे. 

विभागातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)  खडकवासला १.६२, वरसगाव ६.६१, पानेशत ७.०३, घोड २.४५, चासकमान ३.६८, डिंभे ६.९२, निरा देवघर ५.९२, भाटघर १६.३२, मुळशी ७.७२, पवना ४.५९, पिंपळगाव जोगे १.५६, माणिक डोह ४.४८, येडगाव १.४८, उजनी ३८.४४, तुळशी २.२४, दूधगंगा १४.१७, राधानगरी ४.७६, उरमोडी ७.३८, कन्हेर ५.०३, कोयना ६७.१७, तारळी ३.७०, धोम ६.३१, धोम बलकवडी २.२७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com