agriculture news in Marathi, agrowon, to purchase of green gram online registration started | Agrowon

हमीभावाने हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणीस सुरवात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

अकोला  ः शेतकरी प्रतीक्षा करीत असलेली शासनाची हरभरा खरेदीची प्रक्रिया अखेरीस सुरू झाली अाहे. सोमवारपासून  (ता. पाच) अाॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात अाली असून, तातडीने खरेदीसुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळाली अाहे. २९ मे २०१८ पर्यंत ही हरभरा खरेदी केली जाणार अाहे. ज्या भागात हरभरा लागवड अाहे तेथे-तेथे खरेदी केंद्र उघडले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

अकोला  ः शेतकरी प्रतीक्षा करीत असलेली शासनाची हरभरा खरेदीची प्रक्रिया अखेरीस सुरू झाली अाहे. सोमवारपासून  (ता. पाच) अाॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात अाली असून, तातडीने खरेदीसुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळाली अाहे. २९ मे २०१८ पर्यंत ही हरभरा खरेदी केली जाणार अाहे. ज्या भागात हरभरा लागवड अाहे तेथे-तेथे खरेदी केंद्र उघडले जातील, असेही सूत्रांनी सांगितले.

या हंगामात लागवड झालेल्या हरभऱ्याची काढणी जानेवारीपासूनच सुरू झाली. असे असताना बाजारपेठांमध्ये ३३०० ते ३६५० दरम्यान हरभरा विकत अाहे. वास्तविक, हरभऱ्याला ४२५० रुपये हमीभाव व १५० रुपये असा मिळून ४४०० रुपयांचा दर शासनाने जाहीर केला अाहे. मात्र कुठल्याही बाजारात एवढा दर मिळाला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात होती. 

संपूर्ण फेब्रुवारी महिना तसाच गेला. त्यानंतर अात अाॅनलाइन नोंदणीचे व त्यानंतर लगेच खरेदीबाबतचे अादेश जिल्हा यंत्रणांना देण्यात अाले अाहेत. राज्यात या हंगामात कमी व अनियमित पावसामुळे हरभऱ्याच्या लागवडीला फटका बसला आहे. हरभरा पिकाला एकरी नऊ ते साडेनऊ हजार रुपये खर्च लागला अाहे; तर या वर्षी कमी पावसाचा अाणि पीक काढणीला अाले असताना गारपिटीचा मोठा तडाखा बसला. परिणामी, उत्पादकता एकरी तीन ते सहा क्विंटलदरम्यान उत्पादकता अाहे. शासनाने हमीभावाने खरेदीला साधारणतः महिनाभरापूर्वीच सुरवात केली असती तर निदान हमीभाव तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडला असता. अातापर्यंत हजारो क्विंटल हरभरा बाजार समित्यांमध्ये ३००० ते ३५०० दरम्यान विकल्या गेला अाहे.

अाता हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत असल्याने हरभऱ्याचे समाधानकारक दर मिळतील, अशी शक्यता अाहे. नाफेड व इतर एजन्सींच्या माध्यमातून तूर खरेदी प्रमाणेच ही हरभरा खरेदी प्रक्रिया राबवली जात अाहे.   

हरभरा खरेदीसाठी १८५ केंद्र
महाराष्ट्र स्टेट काे-अाॅप-मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-अाॅप मार्केटिंग फेडरेशनमार्फत हरभरा खरेदीबाबत जिल्हा यंत्रणांना अादेश देण्यात अाले अाहेत. सध्या १८५ ठिकाणी तूर खरेदी केंद्र उघडण्यात अाले असून एवढ्याच केंद्रावर हरभरा खरेदी केली जाईल. गरज असेल तर केंद्र वाढवलेसुद्धा जातील. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी अाॅनलाइन नोंदणी करावी, असे अावाहन पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केले.

नावनोंदणीचे अावाहन
हरभरा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी अाॅनलाइन पद्धतीने नावनोंदणी करणे गरजेचे अाहे. नावनोंदणीसाठी अाधार, सातबारा, पेरेपत्रक, बँक खात्याचे डिटेल्स अशी माहिती देणे गरजेचे अाहे. खरेदी सुरू होताच खरेदी केंद्रावर हरभरा अाणण्याबाबत शेतकऱ्यांना मेसेज दिले जाणार अाहेत. हरभऱ्यामध्ये १४ टक्के अार्द्रता स्वीकारली जाईल. शिवाय एफएक्यू दर्जाचाच शेतीमाल खरेदी केला जाणार अाहे.

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...