धानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०१७-२०१८ या हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या धानाला २०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.  राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान जाहीर केले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०१७-२०१८ या हंगामामध्ये राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धानाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. केंद्र सरकारकडून २०१७-२०१८ साठी धानाची आधारभूत किंमत ही साधारण धानासाठी १५५० रुपये एवढी जाहीर करण्यात आली. तर ''अ'' दर्जाच्या धानासाठी १५९० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. 

राज्य सरकारकडून देण्यात येणारी प्रतिक्विंटल २०० रुपये मदत ही फक्त चालू हंगामात हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानासाठीच देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याला फक्त ५ क्विंटलसाठीच ही मदत दिली जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com