रब्बी क्षेत्रात चार लाख हेक्टरने वाढीची शक्यता
मनोज कापडे
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

पुणे : राज्यात खरीप पिकाखालील क्षेत्र दुबार पिकाखाली आणण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात यंदा चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आढावा बैठकीतदेखील दुबार क्षेत्र वाढीबाबत विविध राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

पुणे : राज्यात खरीप पिकाखालील क्षेत्र दुबार पिकाखाली आणण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात यंदा चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आढावा बैठकीतदेखील दुबार क्षेत्र वाढीबाबत विविध राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने विविध राज्यांच्या रब्बी नियोजनाची माहिती घेतली आहे. महाराष्ट्रत मात्र रब्बी ज्वारी आणि गव्हापेक्षा जास्त भर हरभरा क्षेत्र वाढविण्याकडे राहणार आहे. खरिपाखालील एकूण क्षेत्र देखील दुबार पिकांकडे जास्तीत जास्त वळविण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात सध्या दुबार पेरणीखालील क्षेत्र ५५ लाख हेक्टरच्या आसपास आहे. यंदाचा चांगला पाऊस झाल्यामुळे या क्षेत्रात किमान ५९ लाख हेक्टरपर्यंत वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यात मुख्यत्वे हरभरा आणि त्यानंतर गहू व ज्वारीचा समावेश आहे. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ''यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे दुबार क्षेत्र वाढू शकते. मात्र, कायमस्वरूपी वाढ अपेक्षित असल्यास दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी धरणांचे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे व ठिबक तंत्राचा वेगवान प्रसार करावा लागेल. 

उत्तर भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये रब्बी हंगामाची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात गव्हाऐवजी हरभरा उत्पादनावर भर दिला जाणार आहे, असे दिल्लीतील बैठकीतून परतलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पिकांचे अवशेष म्हणून भुसा, पऱ्हाट्या, तुराट्या किंवा उसाचे पाचट जाळून न टाकता कुजवून कंपोस्ट खत तयार करण्यास व त्याच्या वापरास प्रसार करण्यासाठी देखील भर रबी हंगामात दिला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...