agriculture news in marathi, Agrowon, Rabi area would incresein state | Agrowon

राज्यात रब्बी क्षेत्र वाढण्याची शक्‍यता
गोपाल हागे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

अकोला : पावसाचे जवळपास साडेतीन महिने होऊनही वऱ्हाड-विदर्भात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस पडल्याने या वर्षी राज्याच्या रब्बी क्षेत्रात दोन लाख हेक्‍टरपेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असा  अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

रब्बीच्या दृष्टीने आढाव्यासाठी गुरुवारी (ता. १४) पुण्यात बैठक होत आहे. त्यामध्ये रब्बीच्या अनुषंगाने सर्वांगीण चर्चा होणार आहे. कमी पावसामुळे गेल्या काही रब्बी हंगामात पूर्ण लागवडसुद्धा झाली नव्हती. यात विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला होता.

अकोला : पावसाचे जवळपास साडेतीन महिने होऊनही वऱ्हाड-विदर्भात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस पडल्याने या वर्षी राज्याच्या रब्बी क्षेत्रात दोन लाख हेक्‍टरपेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असा  अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

रब्बीच्या दृष्टीने आढाव्यासाठी गुरुवारी (ता. १४) पुण्यात बैठक होत आहे. त्यामध्ये रब्बीच्या अनुषंगाने सर्वांगीण चर्चा होणार आहे. कमी पावसामुळे गेल्या काही रब्बी हंगामात पूर्ण लागवडसुद्धा झाली नव्हती. यात विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला होता.

या वर्षी विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस बऱ्यापैकी होत आहे. प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील पावसाची स्थिती, जलसाठा अधिक असल्याने त्याचा रब्बीसाठी फायदा होण्याची स्थिती असल्याचे सांगितले जाते.

राज्यात प्रामुख्याने हरभरा, रब्बी ज्वारी वाढीची शक्‍यता आहे. राज्यात हरभऱ्याचे १३ लाख ६५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. या वर्षी हे क्षेत्र १५ लाख हेक्‍टरचा आकडा ओलांडू शकते. दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात घेतली जाणारी रब्बी ज्वारीदेखील सव्वातीन लाख हेक्‍टरवरून चार लाख हेक्‍टरचा टप्पा पार करू शकते.

पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांना तडाखा बसलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बीकडून अपेक्षा लावून आहेत. त्यातच या वर्षात विदर्भ सोडता इतरत्र पाऊस चांगला आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता या वर्षी राज्यात रब्बीची दमदार वाटचाल राहण्याची शक्‍यता आहे.

विदर्भात फटका बसण्याची शक्‍यता
या मोसमात अद्यापपर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही. जेमतेम पावसावर खरिपाची पिके टिकून आहेत. परतीचा पाऊस विदर्भ-वऱ्हाडात रमला तर रब्बी साधू शकतो. मात्र पावसाने आतापर्यंतची तूट न भरल्यास रब्बी हंगामावरही परिणाम दिसू शकतो. रब्बीत वऱ्हाडात हरभरा हे मुख्य पीक आहे. शिवाय खरीप गेल्याने शेतकरी रब्बीकडे डोळे लावून बसले आहेत.

रब्बीसाठी पीककर्जाची चिंता

कर्जमाफीच्या घोषणेमुळे या वर्षाच्या कर्जवाटपाच्या प्रक्रियेवर थेट परिणाम झाला. असंख्य जिल्ह्यांमध्ये कर्जवाटपाची स्थिती १० ते ३५ टक्‍क्‍यांदरम्यान आहे. परिणामी, खरिपाच्या पीक कर्जवाटपाची स्थिती चांगली नसताना किमान रब्बीसाठी तरी पीककर्ज मिळेल काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

राज्यातील प्रमुख रब्बी पिके व क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ज्वारी      ३ लाख १६ हजार
गहू         ९ लाख ६७ हजार
हरभरा     १३ लाख ६५ हजार
करडई      १ लाख २४ हजार
एकूण      २७ लाख ७२ हजार
अपेक्षित   २९ लाख ५० हजार

 

 

इतर अॅग्रो विशेष
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
पारंपरिक शेतीपेक्षा रेशीम व्यवसायातून...अंजनवती (ता. जि. बीड) येथील येडे बंधूंनी भागातील...
‘जलयुक्त’मधून खंदर माळवाडीचं शिवार झालं...शेतकऱ्यांनी निवडली व्यावसायिक पीकपद्धती नगर...
नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरावरील...नाशिक : जिल्ह्यात सोमवारपासून (ता.२०)...
राबवा ‘आत्महत्या रोखा अभियान’ कर्जे थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकांनी त्रास...
‘पोल्ट्री’तील संधी ओळखासध्या शेतमालाच्या दराचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे....
द्राक्षावर रोगांचा धोका वाढलासर्व द्राक्ष विभागामध्ये गेले दोन तीन दिवसांमध्ये...
मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद,...
‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर...राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का नागपूर...
दूध संघांना सावरण्यासाठी त्रिसदस्यीय... विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण :...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू१ जानेवारीपर्यंत अर्ज मुदत; ज्वारीसाठी ३०...