agriculture news in marathi, agrowon, rahul gandhi visit farmers | Agrowon

‘...हमें दिलसे काम करनेवाली सरकार चाहिए'
माणिक रासवे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, लघू उद्योजक, छोटे व्यापारी यांचे नसून केवळ बड्या उद्योगपतींचे आहे.

राहुल गांधी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष

एरंडेश्वर, जि. परभणी : ‘हमें मन की बात करनेवाली नहीं, दिलसे काम करनेवाली सरकार चाहिए’, अशा शब्दात येथील शेतकऱ्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद साधून अपेक्षा व्यक्त केल्या.

एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी (ता. ८) एक वयोवृद्ध शेतकरी बाळासाहेब काळे यांनी गर्दीतून प्रश्न विचारला...

अन्‌... दुसऱ्याच क्षणी कठड्यावरून अचानक उडी मारून, सुरक्षाकडे तोडत राहुल गांधी त्यांच्या जवळ पोचले...

रात्रीच्या पावसामुळे चिखल झालेला असताना सुद्धा राहुल यांनी जमिनीवर बैठक मारली... आत्महत्याग्रस्त तेरा शेतकरी कुटुंबीयांशी आस्थेवाइकपणे संवाद साधला...

व्यंकटेश काळे यांनी ‘हमें मन की बात करनेवाली सरकार नहीं चाहिए दिलसे काम करनेवाली चाहिए असे त्यांना म्हणताच राहुल यांनी ऐसी सरकार कौन दे सकता है, असा सवाल केला.

त्या वेळी असंख्य शेतकऱ्यांनी काँग्रेस असे उत्तर दिले. या वेळी राहुल यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. शेतकरी आत्महत्याच करणार नाहीत यासाठी काय करावे लागेल, असा सवाल करून राहुल यांनी शेतकऱ्यांचे मत जाणून घेतले.

या वेळी अहमद पटेल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनीताई पाटील, नसीमखान, प्रकाश सामंत, खासदार राजीव सातव, सुरेश वरपुडकर, अण्णासाहेब काळे,

सरपंच दुर्गेश्वरी काळे, राजेश काळे, संयोजक व्यंकटेश काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश वरपुडकर यांनी केले. व्यंकटेश काळे यांनी आभार मानले. प्रमुख उपस्थितात डॉ. संजय लोलगे, आण्णासाहेब काळे, राजेश काळे, गावाच्या सरपंच दुर्गेश्वरी काळे, अशोक साळवे, अब्दुल वहिदसेठ, किसन काळे यांचा समावेश होता.

अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. या वेळी त्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली.

राहुल आणि शेतकऱ्यांमधील संवाद

  •  कर्जमाफीचा किती जणांना फायदा झाला? पदरात काय पडले?
  • पीकविम्यासाठी किती बेजार केले?
  • जीएसटीने शेतकरी, सामान्यांची लूट
  • नोटाबंदी निर्णयामुळे काय साधले?

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...