दौंड तालुक्‍यातील देऊळगाव, पाटस मंडळांत अतिवृष्टी

पुणे जिल्हा पाऊस
पुणे जिल्हा पाऊस

पुणे : जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्यातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे पिकांना चांगला दिलासा मिळाला. पावसामुळे पूर्व भागातील ओढे, नाले भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. दौंड तालुक्‍यातील देऊळगाव,पाटस मंडळांत अतिवृष्टी झाल्याने काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. 

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारल्याचे चित्र होते. परंतु काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पूर्वेकडील शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्‍यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तूर, मूग, बाजरी पिकांना दिलासा मिळाला. पश्‍चिमेकडील भोर, हवेली, वेल्हा, खेड, मावळ, मुळशी तालुक्‍यांतही पावसाने चांगली हजेरी लावली. उत्तरेकडील जुन्नर तालुक्‍यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.  

पुणे शहरातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे सकाळपासून उकाडा वाढला होता. पश्‍चिमेकडील भोर तालुक्‍यातील भोर, भोळावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबावडे, संगमनेर, निगुडघर मंडळांत जोरदार पाऊस झाला. वडगाव मावळ तालुक्‍यातील काले मंडळात ४५, कार्ला २५ मिमी पावसाची नोंद झाली.

वेल्हा तालुक्‍यातील वेल्हा, पानशेत, विंझर, आंबावणे; खेड तालुक्‍यातील राजगुरुनगर, कुडे, पाइट, चाकण, पिंपळगाव, कडूस; आंबेगाव तालुक्‍यातील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर; शिरूर तालुक्‍यातील वडगाव, न्हावरा, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर; बारामती तालुक्‍यातील बारामती, मळेगाव, पाडरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी; इंदापुरातील भिगवण, इंदापूर, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णे; दौंड तालुक्‍यातील देऊळगाव, पाटस, यवत, केडगाव, राह, रावणगाव, दौंड; पुरंदर तालुक्‍यातील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला.   

मंडळनिहाय शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) ः   हवेली ः पुणे शहर १.९, केशवनगर ३, कोथरूड ११, खडकवासला १८, थेऊर १२, उरुळीकांचन १६, खेड १२, भोसरी १२, चिंचवड १२, कळस ९, हडपसर ९, वाघोली २५.  मुळशी  ः पौड १४, घोटावडे ९, थेरगाव २, मळे ५१ मुठे १४, पिरंगुट ३५  भोर ः भोर ३१, भोळावडे ४२, नसरापूर ६७, किकवी ६५, वेळू १२, आंबावडे २९, संगमनेर ६३, निगुडघर ४६  वडगाव मावळ ः वडगाव मावळ २, तळेगाव २, काले ४५, कार्ला २५, खडकाळा २४, लोणावळा ३३, शिवणे ३२  वेल्हा ः वेल्हा ८, पानशेत ७२, विंझर १०, आंबावणे ३५. खेड ः राजगुरुनगर ४.२, कुडे ३, पाइट ३, चाकण ३.१, पिंपळगाव २, कडूस ३. 

 आंबेगाव ः घोडेगाव २, आंबेगाव ३, कळंब २, पारगाव ३, मंचर १  शिरूर ः वडगाव १५, न्हावरा ७, तळेगाव ६, रांजनगाव १०, कोरेगाव ८, पाबळ ४, शिरूर १५  बारामती ः बारामती २०, मळेगाव १४, पाडरे ३६, वडगाव २५, लोणी ९, सुपा ११, मोरगाव १२, उंडवडी ७   इंदापूर ः भिगवण १३, इंदापूर १३, लोणी ४५, बावडा ५२, काटी ३४, निमगाव १५, अंथुर्णे ४०  दौंड ः देऊळगाव १००, पाटस ८२, यवत २६, केडगाव १६, राहू २०, रावणगाव २६, दौंड ३९  पुरंदर ः सासवड ३४, भिवंडी २९, कुंभारवळण १२, जेजुरी २१, परिंचे १३, राजेवाडी ३०, वाल्हा ४०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com