बेदाणा उत्पादकांना आर्थिक झळ

बेदाणा
बेदाणा

सांगली : गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर कमी अधिक प्रमाणात होत आहेत. तसेच जीएसटीमुळे बेदाण्याची मागणी वीस टक्‍क्‍यांनी घटली आहे. यामुळे पुढच्या पंधरा दिवसांत बेदाण्याच्या मागणी आणि दरात वाढ होण्याची शक्‍यता बेदाणा उद्योगाच्या सूत्रांनी व्यक्त केली. मात्र सद्यःस्थितीला बेदाणा उत्पादकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

गेल्यावर्षीच्या द्राक्ष हंगामात सुरवातीच्या काळात द्राक्षाला दर चांगले मिळाले. त्यामुळे बेदाणा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनीदेखील द्राक्षाची विक्री केली. हंगामाच्या शेटवच्या टप्प्यात द्राक्षाचे दर कमी झाले. उर्वरित द्राक्षांची बेदाणानिर्मिती केली. यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात सुमारे २० ते २५ टक्‍क्‍यांनी घट झाली. परिणामी बेदाण्याचे दर वाढतील अशी बेदाणा उत्पादक शेतरकऱ्यांची आशा होती. परंतु बेदाण्याचे दर न वाढता कमी झाले. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याची २० टक्‍क्‍यांनी मागणी घटली असल्याची माहिती तासगाव बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. याचे कारण जीएसटी सांगण्यात आले आहे. बेदाण्याचे सौदे झाल्यानंतर जीएसटी हा कुणाला लावायचा असा प्रश्‍न उद्भवतो आहे.

गेल्या महिन्यात बेदाण्याला २५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता. हाच दर कायम राहिला नाही. त्यानंतर १५० रुपये दर झाला. गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे दर यंदाच्या हंगामात प्रतिकिलो २० रुपयांनी खाली आले आहेत. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी संकटात आहे. सध्यातरी बेदाण्याला मागणी कमी आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी बेदाणा सौद्यास काढला नसल्याचे चित्र आहे.

दसरा, दिवाळीला दरवाढीची शक्‍यता सध्या मागणी कमी आहे. सप्टेंबरअखेर दसरा आणि पुढच्या महिन्यात दिवाळी सण आहेत. या पार्श्‍वभूमीवर बेदाण्याची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे दरातही वाढ होईल, अशी शक्‍यता वर्तविली जाते आहे.

बेदाण्याच्या दरावर कोणाचाही अंकुश नाही. यामुळे बेदाणा दरात चढ-उतार होत आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेदाण्याचे दर २० रुपयांनी कमीच आहेत. यामुळे बेदाणा उत्पादकांना आर्थिक झळ सोसावी लागते आहे.

- एन. बी. म्हेत्रे,  बेदाणा उत्पादक शेतकरी, तासगाव, जि. सांगली.

बेदाण्याला अपेक्षित अशी मागणी बाजारपेठेत नाही. दसरा-दिवाळी सण जवळ आले आहेत. मात्र, बेदाण्याचे दर वाढलीत अशी आशा आहे.

- श्री. पदमन, बेदाणा उत्पादक शेतकरी, वाळवा, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com