agriculture news in Marathi, agrowon, Ralegan Siddhi villager 'Rasta Roko' | Agrowon

राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 मार्च 2018

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केल्यामुळे राळेगणसिद्धी (जि. नगर) येथेही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी गावातील मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला. याशिवाय उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह विठ्ठल गोविंद मापारी, ज्ञानेश्‍वर हावळे या तिघांनी यादवबाबा मंदिरासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला.
 

नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केल्यामुळे राळेगणसिद्धी (जि. नगर) येथेही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी गावातील मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला. याशिवाय उपसरपंच लाभेश औटी यांच्यासह विठ्ठल गोविंद मापारी, ज्ञानेश्‍वर हावळे या तिघांनी यादवबाबा मंदिरासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच शुक्रवारी रात्री गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढला.
 

शेतीमालाला दर मिळण्यासह शेतीचे प्रश्‍न सुटावेत, लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती आणि इतर विविध प्रश्‍नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर सत्याग्रह आंदोलन सुरू केल्यामुळे शुक्रवारपासून (ता. २३) अण्णा हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी येथे गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. शनिवारी सकाळी प्रभातफेरी काढून राळेगण-वाढेगव्हाण रस्त्यावर मुख्य चौकात दोन तास रास्ता रोको अंदोलन केले. 

दरम्यान अण्णा हजारे यांच्या मागण्याची दखल घेतली नाही तर लढा अधिक तीव्र करणार असल्याचे माजी सरपंच जयसिंग मापारी, बाळासाहेब पठाडे, उपसरपंच लाभेश औटी यांनी सांगितले. या वेळी नायब तहसीलदार दत्तात्रय बाहुले यांनी निवेदन स्वीकारले.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार 
अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू केलेले सत्याग्रह आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने रेल्वे, वाहने अडविण्यात आली. त्यामुळे उद्या रविवारी (ता.२५) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री जर हॅलिकॉप्टरने थेट पाथर्डीला गेले तर थेट पाथर्डीत जाऊन हजारे समर्थक काळे झेंडे दाखविणार असल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...