agriculture news in Marathi, agrowon, Rane, Javadekar and Ketkar in the Rajya Sabha | Agrowon

राणे, जावडेकर, केतकर राज्यसभेवर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 मार्च 2018

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी शेवटपर्यंत सहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुरुवारी (ता. १५) भाजपच्या विजया रहाटकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी शेवटपर्यंत सहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुरुवारी (ता. १५) भाजपच्या विजया रहाटकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.

राज्यसभेसाठी माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. राणे यांच्यासह भाजपचे केरळमधील नेते व्ही. मुरलीधरन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीसुद्धा अर्ज भरला होता. काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादीने वंदना चव्हाण आणि शिवसेनेने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने चौथा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची मंगळवारी छाननी झाली. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. छाननीनंतर १५ मार्च ही अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. यामध्ये विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज भाजपने मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सहा जागांसाठी सहाच अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.

भाजप : प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही. मुरलीधरन
शिवसेना : अनिल देसाई
काँग्रेस : कुमार केतकर
राष्ट्रवादी काँग्रेस : वंदना चव्हाण

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...