म्हैसाळचे आवर्तन वेळेत न सोडल्यास तीव्र आंदोलन

मिरज, जि. सांगली ः येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी गुरुवारी (ता. १५) सर्व पक्षांच्या वतीने एकत्र येऊन मिरज- विजापूर रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आले. (छायाचित्र ः सागर घाडगे, मिरज)
मिरज, जि. सांगली ः येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यासाठी गुरुवारी (ता. १५) सर्व पक्षांच्या वतीने एकत्र येऊन मिरज- विजापूर रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आले. (छायाचित्र ः सागर घाडगे, मिरज)

सांगली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन येत्या चार दिवसांत सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा गुरुवारी (ता. १५) मिरज- विजापूर रास्ता रोको करत शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. या वेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू नसल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. योजना सुरू करण्यासाठी शेतकरी शासनाला विनवण्या करतो आहे. तरीदेखील या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. योजना सुरू नसल्याने द्राक्षबागेला टॅंकरद्वारे पाणी घालावे लागत आहे. शेतात असलेली पिके वाळू लगली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

रास्ता रोको केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्या निवदेनात म्हटले आहे, की मिरज, कवठेमहांकाळ, जत, सांगोला आणि तासगाव तालुक्‍यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. म्हैसाळ योजना सुरू झाली नाही, तर टॅंकरवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. टॅंकरवर खर्च करण्यापेक्षा म्हैसाळ प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याच्या लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत केवळ घोषणा केल्या जातात; पण योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याचे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या मोर्चात सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मनोज शिंदे (म्हैसाळकर), अण्णासाहेब कोरे, अनिल आमटवणे, बी. आर. पाटील, संजय काटे, बाळासाहेब होनमारे, तानाजी दळवी, सुजित लकडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com